Wednesday, January 14, 2026
Home बॉलीवूड उर्वशीची नवी करामत! व्हिडिओ शेअर करत रिषभ पंतला म्हणाली, ‘आय लव्ह यू’

उर्वशीची नवी करामत! व्हिडिओ शेअर करत रिषभ पंतला म्हणाली, ‘आय लव्ह यू’

आपल्या सुंदरतेमुळे ओळखली जाणारी उर्वशी रौतेला चित्रपटांपेक्षा जास्त आपल्या वैयक्तीक आयुष्यासाठी  ओळखली जाते. तिने केलेल्या सोशल मीडिया पोस्ट नेहमीच रिषभ पंत याच्या नावाशी जोडल्या जातात. गेल्या काही दिवसांमध्ये उर्वशीने कोणतीही हालचाल केली की, लगेच तिला रिषभच्या नावाने ट्रोल केले जाते. आता पुन्हा एकदा तिने आपला नवीन व्हिडिओ शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे.

उर्वशी रौतेला (Rautela, Urvashi ) हिने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती ‘लव्ह यू लव्ह यू म्हणताना दिसली होती. तिने यापूर्वीही अनेक फोटो शेअर केले होते ज्यामुळे ती सोशल मीडियावर खूपच चर्चेत आली होती. उर्वशी सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. तिने काही दिवसांपूर्वी भांगेत सिंदूर भरुन आणि गळ्यात मंगळसूत्र घलून फोटो शेअर केले होते. आता पुन्हा एकदा चर्चेत राहण्यासाठी तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती ‘एकदा तरी आय लव्ह यू बोल,
एकदा आय लव्ह यू बोल प्लीज’ असे बोलताना दिसून येत आहे. उर्वशीने हा व्हिडिओ शेअर करताच तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून प्रत्येकाने निशाना रिषभ पंतवर साधला. सगळ्यांची एकच प्रतिक्रिया होती की, व्हिडिओ रिषभसाठीच टाकला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Urvashi Rautela (@urvashirautela)

उर्वशी नेहमी प्रमाने आधी चूक करते आणि नंतर त्याची सविस्तर माहिती देते. यावेळेसही तिने हिच प्रक्रिया केली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिने सोशल मीडियवर नोट लिहून व्हायरल व्हिडिओबद्दल सत्य काय आहे ते सांगितले. तिने नोटमध्ये लिहिले की, “या दिवसामध्ये माझा ‘आय लव्ह यू’ व्हिडिओ व्हायरल होत आहे. मला हेच सिद्ध करायचे आहे की, हा व्हिडिओ फक्त अभिनयाच्या दृष्टीकोणाने बनवला होता, हा एक डायलॉग सीन साठी डायरेक्ट केला होता, ना की, कोणत्या स्पेशल व्यक्तीसाठी आणि ना हे व्हिडिओ कॉलचा हिस्सा आहे.”

उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, काही पत्रकारानुसार उर्वशी ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडीयाला चिअर करण्यासाठी आली आहे, तर काही पत्रकाराच्या माहितीनुसार सांगितले जात आहे की, उर्वशी कोणत्यातरी प्रोजेक्टकच्या कामासाठी ऑस्ट्रेलियामध्ये आली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेहा वाचा-
लाफ्टर क्वीन अर्चनाच्या अवाजावर कश्मिरा शाहने उडवली खिल्ली; म्हणाली,’हिचा आवाज फक्त जनावर…’
इंडस्ट्रीत10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आलियाची पोस्ट; म्हणाली, ‘मी अजून चांगली कलाकार…’

हे देखील वाचा