Friday, March 20, 2026
Home अन्य पाहा कोण आहे ‘ही’ अभिनेत्री; स्ट्रगलिंगच्या काळात शुट केला होता हा बोल्ड फोटो, आज आहे करोडोंची मालकिण

पाहा कोण आहे ‘ही’ अभिनेत्री; स्ट्रगलिंगच्या काळात शुट केला होता हा बोल्ड फोटो, आज आहे करोडोंची मालकिण

बॉलिवूडपासून ते हॉलिवूडचा टप्पा अतिशय कमी वेळात गाठणारी प्रियंका चोप्रा ही पहिली बॉलिवूड अभिनेत्री आहे. आपल्या अभिनयाच्या आणि मेहनतीच्या जोरावर ती आज सर्वत्र एक ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. बॉलिवूडमध्ये ती सध्या काम करत नसली तरी, तिची चर्चा सर्वत्र असते.

काही दिवसांपूर्वी तिने तिच्या ‘अनफिनीश’ या पुस्तकात तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टींचा खुलासा केला आहे. शिवाय तिने अमेरिकेत दिलेल्या एका मुलाखतीत प्रेक्षकांना हैराण करतील अशा काही गोष्टी शेअर केल्या आहेत. नुकतेच तिने काही तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये तिने बिकिनी टॉपमधील एक थ्रो बॅक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे.

प्रियांकाने जो फोटो शेअर केलेला फोटो खूप जुना आहे. या फोटोत तिने सफेद रंगाची बिकिनी टॉप आणि जीन्स घातली आहे. या फोटोमध्ये ती खूपच वेगळी दिसत आहे. या आऊटफिटमध्ये ती खूपच बोल्ड अंदाजात कॅमेरा समोर पोज देताना दिसत आहे. प्रियांकाने शेअर केलेला हा फोटो ती जेव्हा मॉडेलिंग करायची त्या दिवसातील आहे.

ही पोस्ट शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, ” बोल्डनेसला मी कधी घाबरत नाही. लाजाळू??? हा शब्द मी कधी माझ्याबाबत ऐकलंच नाही.” या सोबतच तिने #Bindiandbikini हा हॅशटॅग देऊन टिकली आणि बिकिनीमधील संबंध सांगितला आहे. या फोटोमध्ये स्पष्ट दिसत नाहीये. पण कॅप्शन वाचून असं वाटत आहे की, प्रियंकाने बिकिनीसोबत टिकली लावली आहे. तिचा हा फोटो सगळ्यांना खूपच आवडत आहे. सगळ्यांकडून तिच्या या फोटोला खूपच लाइक्स आणि कमेंट मिळताना दिसत आहे..

हे देखील वाचा