बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत अगदी पाकिस्तानी इंडस्ट्रीमध्ये देखील लैंगिक शोषणाविरुद्ध चाललेल्या मोहिमेत इंडस्ट्रीमध्ये चाललेल्या काळ्या सत्याची ओळख संपूर्ण जगाला होत आहे. अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत झालेल्या शोषणाची माहिती दिलीच आहे, पण त्यासोबतच आता या झगमगत्या दुनियेमागे असणारे काळे सत्य आणि अश्लील गोष्टीही समोर आल्या आहेत. पाकिस्तानी अभिनेत्री सबा बुखारीने पाकिस्तानी इंडस्ट्रीमध्ये होणाऱ्या शोषण आणि इतर गोष्टींचा खुलासा केला आहे.
‘दिल ना उम्मीद ही सही’ या पाकिस्तानी मालिकेतून आपलं नाव कमावणारी अभिनेत्री सबा बुखारीने सांगितले की, तिने कास्टिंग काऊचचा सामना केला आहे. एका मुलाखतीत तिने सांगितले की, एक रोल मिळाल्यानंतर तिला कॉल करून तिच्याशी कशाप्रकारे अश्लील गोष्टी बोलल्या जात होत्या. या गोष्टीने ती खूपच घाबरली होती.
https://www.instagram.com/p/CMeu-n5h8Ga/?utm_source=ig_web_copy_link
सबा बुखारीने सांगितले की, “मला काम मिळाल्यानंतर कॉल आला आणि त्यांनी सांगितले की, तुम्हाला चांगला रोल मिळाला आहे आणि पेमेंट देखील चांगले आहे. पण या बदल्यात तुम्ही आम्हाला काय देणार. मला असे वाटले की ते माझ्याकडे पैसे मागत आहे. पण त्यांनी माझ्यासोबत एकत्र झोपण्याची चर्चा केली. त्यावेळी मात्र माझ्या पाया खालची जमीनच सरकली आणि मी फोन कट केला.”
या आधी सबाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट करून कास्टिंग काऊचचा तिचा अनुभव शेअर केला होता. तिने सांगितले होते की, इंडस्ट्रीमधील पुरुष दिग्दर्शकांनी दिला सल्ला दिला होता आणि त्यामुळे ती पूर्णपणे तुटून गेली होती.
ही पोस्ट शेअर करत तिने सांगितले की, “आधी तर मी सोशल मीडियावर जास्त सक्रिय देखील नव्हते. परंतु तेव्हा माझ्या पोस्टला खूप प्रतिसाद दिला. मला माहित नाही मला एवढा प्रतिसाद कसा काय मिळाला. पण मी या गोष्टींनी खूपच खुश आहे. मी आधी सोशल मीडियावर जास्त सक्रिय नसायची. पण मला सांगितलं गेलं की काम मिळण्यासाठी तुला सक्रिय राहणं खूप गरजेचं आहे.”
याआधी देखील पाकिस्तानी चित्रपटसृष्टीत #metoo मुव्हमेंटसोबत सुरुवातीला अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत घडलेल्या लैंगिक शोषण, कास्टिंग काऊच आणि इतर अत्याचारा बाबत खुलासा केला आहे. याबाबत खुलासा करताना अभिनेत्री जारा हिने देखील तिचे मत मांडले आहे.
जारा म्हणते की, “ही गोष्ट केवळ आपल्या क्षेत्रापुरती मर्यादित नाहीये, तर जगात आणि आपल्या देशात या गोष्टी होत आहेत. मी असं नाही म्हणत की, मी एक स्त्री आहे म्हणून सगळ्या पुरुषांनी माझं ऐकावं. अनेक पुरुष देखील या गोष्टीने त्रस्त आहेत की, महिला देखील त्यांची कोणतीच गोष्ट ऐकत नाही. पण पाकिस्तानी महिलांना या परिस्थितीतून जावे लागते.”
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-दिपीका-रणवीरच्या रोमान्सच्या व्हिडीओची इंटरनेटवर एकच चर्चा, सोशल मीडियावर शेअर केलाय व्हिडीओ
-रश्मिका आणि कार्ती यांच्या बहूचर्चित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, प्रेक्षक सिनेमाच्या प्रतीक्षेत










