बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्याची पत्नी नताशा स्टॅन्कोविक आजकाल सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन ती सतत चाहत्यांशी संवाद साधत असते. नताशा तिच्या ग्लॅमरस स्टाईलसाठी ओळखली जाते. नुकताच समोर आलेला तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनत आहे.
या व्हिडिओमध्ये अभिनेत्री पूलमध्ये चिल करताना दिसत आहे. तिने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
व्हिडिओमध्ये नताशाने काळ्या रंगाचे कपडे परिधान करून, काळा गॉगल घातलेला दिसत आहे. यात तिचा लूक आणि स्टाईल अप्रतिम असून अगदी पाहण्याजोगी आहे. याशिवाय अभिनेत्रीचा एक फोटो बऱ्याच चर्चा रंगवत आहे, ज्यामध्ये ती पूलमध्ये चिल करताना दिसली. चाहते या व्हिडिओ आणि फोटोवर भरभरून कमेंट करत आहेत. चाहत्यांनी पोस्टवर फायर इमोजी आणि हार्ट शेप इमोजी शेअर करून प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तसेच, नताशा तिच्या सोशल मीडिया पोस्टसह चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही.
नताशा स्टॅन्कोविकने ‘सत्याग्रह’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिने ‘बिग बॉस 8’ आणि ‘नच बलिये’ या रियॅलिटी शोमध्ये भाग घेऊन बरीच प्रसिद्धी मिळवली. या व्यतिरिक्त तिने बादशाहसोबत ‘डीजे बाबू’ गाण्यात तिच्या डान्स मुव्हजने खूप धमाल केली होती.
नताशा स्टॅन्कोविक आणि हार्दिक पंड्या यांचे गेल्या वर्षी लग्न झाले आहे. त्यांना एक मुलगा देखील आहे, ज्याचे नाव अगस्त्य पंड्या आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-दिपीका-रणवीरच्या रोमान्सच्या व्हिडीओची इंटरनेटवर एकच चर्चा, सोशल मीडियावर शेअर केलाय व्हिडीओ
-रश्मिका आणि कार्ती यांच्या बहूचर्चित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, प्रेक्षक सिनेमाच्या प्रतीक्षेत