बॉलिवूड ते भारताच्या प्रत्येक चित्रपटसृष्टीतील कलाकार आज होळीचा आनंद लुटताना दिसत आहेत. यादरम्यानचे व्हिडिओ, फोटो शेअर करत ते आपल्या चाहत्यांसोबत होळी साजरी करत आहेत. यामध्ये भोजपुरीतील आघाडीची अभिनेत्री अक्षरा सिंगही मागे नाहीये. अक्षरानेही इतर कलाकारांप्रमाणे होळीच्या सणामध्ये सहभाग घेतला आहे. परंतु तिने यावेळी होळी अनोख्या पद्धतीने साजरी केली आहे. ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. त्यामुळे तिने पोस्ट शेअर करताच चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडू लागतात. तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर होळीच्या निमित्ताने काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती गरीब मुलांसोबत दिसत आहे.
अक्षराने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर गरीब मुलांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने लिहिले की, “निखळ प्रेम.” यासोबतच तिने या पोस्टमध्ये तुमच्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद असेही लिहिले आहे.
या होळीला सर्व कलाकार आपापल्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत होळी साजरी करत आहेत. परंतु अक्षरा मात्र हा खास क्षण गरीब मुलांसोबत साजरा करत आहेत.
अक्षरासोबत दिसणारी सर्व मुले खूपच खुश दिसत आहेत. त्यांच्यासोबतच अक्षराही खुश दिसत आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी अक्षरश: लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. यासोबतच ते तिची प्रशंसाही करत आहेत. तिच्या या पोस्टवर एका चाहत्याने लिहिले की, “खूप चांगलं काम. मला तुझा अभिमान आहे.” याव्यतिरिक्त दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, “छान दीदी.”
अक्षराने ‘दिलवाला’, ‘धडकन’, ‘सत्या’, ‘लैला मजनू’, ‘त्रिदेव’ यांसारख्या भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे. याव्यतिरिक्त अक्षराचे म्युझिक व्हिडिओही जबरदस्त व्हायरल होताना दिसतात.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-