Tuesday, June 24, 2025
Home साऊथ सिनेमा वडिलांच्या वाढदिवसानिमित्त ‘बाहुबली’ फेम प्रभासने खरेदी केली नवीन कार; किंमत वाचून सरकेल पायाखालची जमीन

वडिलांच्या वाढदिवसानिमित्त ‘बाहुबली’ फेम प्रभासने खरेदी केली नवीन कार; किंमत वाचून सरकेल पायाखालची जमीन

दक्षिण सिनेमाचा सुपरस्टार प्रभासने फारच कमी वेळात भारतीय चित्रपटसृष्टीवर आपली छाप सोडली आहे. प्रभासने ‘बाहुबली’ चित्रपटाद्वारे दक्षिण भारतातच नव्हे, तर भारताच्या कानाकोपऱ्यात आपला चाहतावर्ग बनवला आहे, जो अभिनेत्यावर खूप प्रेम करतो. त्याचा प्रत्येक चित्रपट सुपरहिट असण्यामागे, त्याच्या चाहत्यांचे प्रेम आहे, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. प्रभासच्या चित्रपटांना केवळ दक्षिण भारतातच नव्हे, तर उत्तर भारतातही मोठ्या आवडीने पाहिले जाते. बॉलिवूडमध्येही अभिनेत्याने स्वत: ची एक खास ओळख बनविली आहे. प्रभासच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांनी प्रचंड कमाई केली आहे. याचा फायदा प्रभासलाही झाला आहे. कमाईच्या जोरावर आता ‘बाहुबली’ प्रभासने एक कार विकत घेतली आहे, त्याची किंमत जाणून लोक चकित झाले आहेत.

तेलुगु सिनेमातील कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात प्रभास म्हणाला होता की, लॅम्बॉर्गिनीची स्पोर्ट्स कार खरेदी करणे हे त्याचे स्वप्न आहे. आता प्रभासने त्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. त्याने वडिलांच्या वाढदिवशी लॅम्बॉर्गिनी अ‍ॅव्हेंटोर कार खरेदी केली. प्रभासच्या या सुंदर स्पोर्ट्स कारची किंमत आहे 6 कोटी! होय, तुम्ही बरोबर वाचलं. या कारची किंमत सुमारे 6 कोटी आहे. प्रभासचे चाहतेही त्याच्या कारचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. यामुळे त्याच्या कारशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये प्रभास गाडीजवळ उभा असलेला दिसत आहे. काही व्हिडिओंमध्ये तो रस्त्यावर गाडी चालवतानाही दिसला आहे.

प्रभासच्या वर्क-फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर त्याने नुकतेच ‘राधे श्याम’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. यासोबतच तो ‘आदिपुरुष’ आणि ‘सलार’ या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यानंतर प्रभास दिग्दर्शक नाग अश्विनच्या चित्रपटात काम करणार असून, यात दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय, चित्रपटात अमिताभ बच्चनही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉलिवूडच्या ‘खिलाडी’ने केले ‘असे’ ट्वीट की झाला भलताच ट्रोल, नेटकरी म्हणालेे ‘ईदलाही हेच म्हणणार?’

-प्रेम हे! ‘हॅप्पी किस डे’ म्हणत प्रिन्सने केला पत्नी युविकाला किस करतानाचा फोटो शेअर; वेधले चाहत्यांचे लक्ष

-अभिनेत्री मलायकाकडून चाहत्यांना होळीच्या कलरफूल शुभेच्छा! फोटो होतोय जोरदार व्हायरल

हे देखील वाचा