Sunday, January 12, 2025
Home टेलिव्हिजन धक्कादायक! ‘तारक मेहेता का उल्टा चष्मा’ फेम मुनमुन दत्ताचा जर्मनीत अपघात

धक्कादायक! ‘तारक मेहेता का उल्टा चष्मा’ फेम मुनमुन दत्ताचा जर्मनीत अपघात

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शाे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा‘ला काेणाची तरी नजर लागली आहे. या शोमध्ये पहिले जेठालालचे वडील ‘चंपक चाचा’ यांची भूमिका साकारणाऱ्या अमित भट्ट याचा अपघात झाला होता तर, आता या मालिकेत आपल्या साैन्दऱ्याने सर्वांचे लक्ष वेधनारी मुनमुन दत्ता हिचा देखील अपघात झाला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करून तिच्या चाहत्यांना अपघाताची माहिती दिली.

शोमध्ये बबिता जीची भूमिका साकारणारी मुनमुन दत्ता (Munmun Dutta) नुकतीच युरोप प्रवासासाठी निघाली हाेती, पण दुर्दैवाने घरी परतत असताना जर्मनीत अभिनेत्रीला अपघात झाला. मुनमुनने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीमध्ये सांगितले की, “जर्मनीमध्ये एक छोटासा अपघात झाला. माझा डावा गुडघा खूप दुखत होता. त्यामुळे मला माझा दौरा संपवून घरी परतावे लागले आहे.”

???????????????????????? ????????????????????
Photo Courtesy Instagrammmoonstar

दोनच दिवसांपूर्वी मुनमुन स्वित्झर्लंडमधील इंटरलेकन येथून ट्रेनने जर्मनीला गेली होती. तिने आवडलेल्या काही खाद्यपदार्थांची छायाचित्रे देखील शेअर केली. या फाटाेंमध्ये अभिनेत्री हॉट चॉकलेट खाताना दिसत आहे.

अल्बम शेअर करताना मुनमुनने विचारले होते की, “हॉट चॉकलेट किती आहे?” यावर उत्तर देताना ती म्हणाली, “माझ्या अंदाजाने काही फरक पडत नाही कारण, अशा छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या मोठ्या देशांमध्ये घडत राहतात.” अभिनेत्रीने लिंड म्युझियमलाही भेट दिली आणि खूप मजा केली.

याआधी शोमध्ये बापूजींची भूमिका साकारणाऱ्या अमित भट्टचाही शूटिंगदरम्यान अपघात झाला होता.अपघातात दुखापत झाल्यामुळे त्याने शूटिंगला येणे बंद केल्याची अफवा हाेती. या अफवांमुळे व्यथित झालेल्या अमित भट्ट यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून सत्य सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amit Bhatt (@amitbhatt9507)

अमित भट्ट म्हणाले, “काही दिवसांपासून सोशल मीडियावर माझ्या अपघाताच्या बातम्या समाेर येत आहेत. मला सांगायचे आहे की, या बातम्या खोट्या आहेत. तसे काहीही झालेले नाही. मला किरकोळ दुखापत झाली आहे. मी पूर्णपणे ठीक आहे आणि तुमच्या समोर आहे. (tv taarak mehta ka ooltah chashmah fame babita ji munmun dutta met with an accident in germany)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
धक्कादायक! अमेरिकेतील कॉन्सर्टनंतर श्रेया घोषालचा आवाजच गेला, उपचारासाठी धावले डॉक्टर

‘इतिहास माहिती नसेल तर पुस्तके पाठवतो’, छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान केल्याने भडकले अमोल कोल्हे, व्हिडिओतून भाजपवर टीका

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा