देशासाठी पहिल आंतरराष्ट्रीय पदक मिळवणारा लाल मातीतला माणूस म्हणजेच खाशाबा जाधव याच कर्तृत्व गावाच्या लाल मातीतच दाबून राहिले. त्यामुळे आता देशातील पहिल्या कास्यपदक विजेत्या खाशाबा जाधव याची संघर्षमये कहाणी माेठ्या पडद्यावर झळकणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे (mangesh chivate) यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून माहिती दिली की, “प्रसिद्ध दिग्दर्शक श्री नागराज मंजुळे (nagraj manjules) यांच्या माध्यमातून पै. स्व. खाशाबा जाधव ( khashaba jadhav ) यांची संघर्षमय जीवनगाथा असणारा चित्रपट बनणार आहे.” त्यांनी पुढे सांगितले, “देशााल पहिले ऑलम्पिक मेडल मिळवून देणारे पै. स्व. खाशाबा जाधव यांस मृत्यूनंतर पद्म पुरस्कार मिळावा यासाठी संग्राम कांबळे, युवराज काकडे यांच्या साथीने राज्य आणि केंद्र स्तरावर पाठपुरावा करत आहे. लवकरच याला यश मिळेल.”
भारताची नाव ‘या’ दाेन व्यक्तिमत्वने उंचावली
सण 1947ला देश स्वतंत्र झाल्यानंतर भारताची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर तयार करण्याचा नवीन लढा देशात सुरू झाला होता. त्यावेळी, क्रीडा क्षेत्रात ज्यांनी भारताचे नाव उंचावले अशी दोन व्यक्तिमत्व म्हणजे कुस्तीतले पै. खाशाबा जाधव आणि हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद. ऑलिम्पिकमध्ये स्वतंत्र भारताला पहिलं वैयक्तिक मेडल या दाेघांनी मिळवून दिले. आता याच पहिल्या ऑलिंम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर सिनेमा बनणार आहे, ही महाराष्ट्र आणि देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
संजय दुधाणे यांनी खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर लिहिले पुस्तक
ज्येष्ठ क्रीडा पत्रकार संजय दुधाणे यांनी पै. खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर ‘ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव’ या नावाचं पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात मेडल जिंकलेल्या प्रवासाचं वर्णन केलेलं आहे. (nagraj manjules upcomming movie on wrestler khashaba jadhav 1952 olympic wrestlers on the screen)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
झुंड चित्रपटातील ‘या’ कलाकाराला अटक, 5 लाख रुपयाचे दागिने चोरी केल्याचा आरोप
राखी सावंतने सांगितला होळीचा किस्सा, जेव्हा तिने फुगे समजून कंडोममध्ये भरले होते पाणी तेव्हा…