बॉलिवूड अभिनेता सोनू सूदची प्रतिमा एका मसीहाची झाली आहे. अनेकदा सोनू लोकांना मदत करण्यासाठी चर्चेत राहतो. परंतु आज सोनू एखाद्याचे जीवन वाचवण्यासाठी केलेल्या मदतीबद्दल नव्हे, तर त्याच्या शरीराच्या तंदुरुस्तीमुळे चर्चेत आला आहे. सोनूने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो पाहून हे स्पष्ट होते की, सोनू केवळ मनानेच नव्हे, तर शरीरानेही खूप शक्तिशाली आहे.
सोनू सूद बऱ्याचदा सोशल मीडियामार्फत मदतीसाठी हात पुढे करताना दिसतो. सोनूच्या ट्विटर अकाउंटवर बर्याचदा अशाच पोस्ट्स पाहिल्या जातात. पण सध्या, अभिनेत्याने एक वेगळा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेता प्लॅंक व्यायाम करताना दिसत आहे. केवळ प्लँक व्यायाम करत आहे असे नाही, तर सोनू सूदवर दोन लोक देखील उभे राहिलेले दिसत आहेत.
त्या दोघांचे वजन घेऊन सोनू व्यायाम करत असल्याचे पाहून, चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. सोनूवर स्वार होणार्या दोघांचे वजन सुमारे 154 किलो आहे. सोनूने हा व्हिडिओ ट्वीट करून लिहिले आहे ‘प्लँक डे’. या बरोबरच ‘असा प्रयत्न करू नका’ असा इशारादेखील त्याने चाहत्यांना दिला आहे.
Plank day.
Please don't try ???? pic.twitter.com/EUeyMalFEN— sonu sood (@SonuSood) March 29, 2021
सोनू सूदने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरही शेअर केला आहे. व्हिडिओ पाहून चाहते यावर जोरदार प्रतिक्रिया देत आहेत. तसेच त्यांनी व्हिडिओवर लाईक्सचा पाऊस पाडला आहे. कमेंट करत एकाने लिहिले की, “सामान्य प्लॅंकदेखील आमच्याकडून शक्य होत नाही,” तर एकाने लिहिले की, “बाप रे काय पिक आहे, हा पिक जगभर व्हायरल होईल.”
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-दिलजीतने शेअर केला मुलासोबतचा मजेशीर व्हिडिओ, सेलेब्सनी विचारले ‘आई कुठे आहे?’
-मराठमोळी जोडी रितेश अन् जेनेलियाही रंगले होळीच्या रंगात, रोमँटिक व्हिडिओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!!
-इरफान खानच्या आठवणीत मुलगा बाबिल झाला भावुक; वडिलांचे कपडे परिधान करत दिला आठवणींना उजाळा










