Friday, November 14, 2025
Home टेलिव्हिजन VIDEO | 25 लाख गमावले! टास्कदरम्यान सुंबुलवर चांगलीच संतापली अर्चना गौतम

VIDEO | 25 लाख गमावले! टास्कदरम्यान सुंबुलवर चांगलीच संतापली अर्चना गौतम

छाेट्या पडद्यावरील वादग्रस्त शाे ‘बिग बॉस 16‘मध्ये घरातील प्रत्येक नवीन टास्कसोबत एक नवीन वाद पाहायला मिळत आहे. शोच्या आगामी भागात पुन्हा एकदा असेच दृश्य पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये अर्चना गौतम आणि सुंबुल तौकीर एकमेकांशी भांडताना दिसणार आहेत. त्यांच्याशिवाय, निम्रित कौर आणि शालीन भानोत यांच्यातही वाद बघायला मिळणार आहे, जे इतके वाढणार की, निमृत शालीनला कोर्टात खेचण्याची धमकी देईल.

बिग बॉस 16 (bigg boss 16) च्या निर्मात्यांनी शोच्या आगामी भागाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये सर्व घरातील सदस्य बागेच्या परिसरात टास्कसाठी तयार होताना दिसत आहेत. बिग बॉस प्रत्येकाला सांगतो की, “ते कॅप्टेंसी आणि बक्षीस रक्कम गमावलेल्या 25 लाख यापैकी एक निवडू शकतात, ज्याची जबाबदारी सुंबुल तौकीरकडे आहे.” सुंबूल बिग बॉसला सांगते की, “ती 25 लाख देत आहे आणि तिला कॅप्टेंसीचा दावा कायम ठेवायचा आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

सुंबुलच्या या निर्णयावर शेजारी उभी असलेली अर्चना गौतम संतप्त होते आणि ’25 लाख गमावले’ असे ओरडते. “तुझ्यामुळे 25 लाख गेले होते, त्यामुळे ते परत आणणे तुझे कर्तव्य आहे.” असे अर्चना म्हणते. यावर उत्तर देताना सुंबुल म्हणते, “तुझ्या खिश्यातुन नाही गेले.” त्यावर चिडलेली अर्चना म्हणते, “तू उद्या निघून जाशील…स्वत:चा चेहरा बघ… तू राणी हाेशील?”

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

व्हिडिओमध्ये, बिग बॉस पुढे स्पष्ट करतात की, टास्कमध्ये, सर्व स्पर्धकांना सोन्याची बिस्किटे गोळा करून त्यांच्या संबंधित लॉकरमध्ये ठेवावी लागतील, जो जास्तीत जास्त सोनेरी बिस्किटे गोळा करेल तो टास्कचा विजेता असेल. टास्कच्या मध्यभागी, शालीनचे कॅप्टन निमृतशी वाद होतो आणि तो तिच्या मानसिक आरोग्याच्या समस्येवर भाष्य करतो, जे ऐकून निमृतचा राग अनावर हाेताे. यादरम्यान दोघांमध्ये चांगलेच भांडण होते, घरातील सदस्य मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतात, परंतु निमृतचा राग सातव्या आसमानावर पोहोचतो आणि ती शालीनला कोर्टात खेचण्याची धमकी देते. (bigg boss 16 archana gautam sumbul touqeer get into an ugly fight on loosing 25 lakhs during task)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
श्रेयसचं नशीब फळफळलं! ‘पुष्पा’ने मिळवून दिल्या भरमसाठ ऑफर्स, पण अभिनेता म्हणाला…

‘ज्या वयात मुलं खेळायची, माझा मुलगा इंजेक्शन मोजायचा’, कँसरग्रस्त मुलाचे हाल ऐकून अमिताभही भावूक

हे देखील वाचा