बिग बॉस फेम कविता कौशिक ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या फोटोंना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत लाईक्स आणि कमेंट मिळत असतात. सध्या ती तिच्या सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. तिच्या या फोटोवर प्रेक्षक प्रतिक्रिया देत आहेत, तर दुसरीकडे तिने या फोटोत घातलेल्या मोनोकनीची तुलना कॅटरिना कैफच्या मोनोकनीसोबत केली जात आहे.
कविताने गुलाबी रंगाची मोनोकनी घालून फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोमध्ये ती समुद्र किनारी योगा करताना दिसत आहे. या फोटोमध्ये ती खूपच बोल्ड आणि हॉट दिसत आहे. तिचा हा फोटो पाहून यावर कमेंट करण्यापासून कोणीही स्वत: ला थांबवू शकत नाही.
अभिनेत्री कॅटरीना कैफने ‘बॅंग बॅंग’ या चित्रपटात अशीच गुलाबी रंगाची मोनोकनी घातली होती. त्यामुळे सगळे जण आता या दोघींचीही तुलना करू लागले आहेत. तिचे सगळे चाहते कमेंट करून तिला कॅटरिनाने घातलेल्या मोनोकनीची आठवण करून देत आहेत. हा तिचा फोटो शेअर करत कविता कौशिकने लिहिले आहे की, “खूप ऊन आहे.”
कविता कौशिक तिच्या फिटनेसबद्दल खूप जागरूक असते. ती नेहमीच बिकिनी घालून योगा करताना दिसते. याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
तिच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने एफआयआर या मालिकेमध्ये चंद्रमुखी रौटाला हिचे पात्र निभावले होते. यानंतर ती लाईमलाईटपासून लांब गेली आणि बिग बॉस 14 मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आली.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘गब्बर’ धवनसोबत थिरकली युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा, भांगडा नृत्य करत वेधले नेटकऱ्यांचे लक्ष
-‘सगळं ठीक तर आहे ना?’ म्हणत सुष्मिताच्या भावनिक पोस्टवर चाहत्यांची प्रतिक्रिया