Sunday, September 27, 2026
Home › बॉलीवूड › द वनची बॅाक्स ऑफिसवर जोरदार घोडदौड, सिद्धार्थ-तमन्नाच्या सिनेमाने 2 दिवसांत कमावले इतके कोटी

द वनची बॅाक्स ऑफिसवर जोरदार घोडदौड, सिद्धार्थ-तमन्नाच्या सिनेमाने 2 दिवसांत कमावले इतके कोटी

द वन फोर्स ऑफ द फॉरेस्टने भारतीय बाॅक्स ऑफिसवर दुसऱ्या दिवशीही चांगली कामगिरी केली. सिद्धार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटिया अभिनीत या चित्रपटने शनिवारी पहिल्या दिवसाच्या कमाईत 37.5 टक्के वाढ नोंदवली आहे. संमिश्र प्रतिक्रिया असुनही सिद्धार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटिया याच्या चित्रपटाने अगदी 2 दिवसांत उत्तम कमाई केली आहे. ज्यामुळे भारतातील त्याचे एकुण निव्वळ कमाई 19 कोटींवर पोहचली आहे. सध्याचा बाॅक्स ऑफिस पाहता हा चित्रपट वीकएंडला उत्तम कमाई करेल असे वाटत आहे.

या चित्रपटाचे सॅकनिल्कनुसार या भारतातील दोन दिवसांची एकुण निव्वळ कमाई रु 19 कोटीवर पोहचली आहे. हा चित्रपट 25 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये रीलीज झाला आहे. या चित्रपटाने भारतात पहिल्याच दिवशी 8 कोटी कमावले. शनिवारच्या आकडेवारीत अधिक वाढ दिसुन आली. त्यामुळे एकुण कमाई 11 कोटींवर पोहचली आहे.

द वन (the vvan)फोर्स ऑफ द फॉरेस्ट मध्ये तमन्ना भाटिया आणि सिध्दार्थ मल्होत्रा हे दोघे मुख्य भुमिकेत आहेत. त्याच्या व्यतिरिक्त अनुप सोनी, सुनील ग्रोव्हर, श्वेता तिवारी आणि मनीष पॉल यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट एक पारंपारिक लोककथा आणि अलौकिक शक्तींना प्रभावित असलेल्या जगाभोवती फिरते. जर तुम्हाला रहस्यामय आणि लोककथा आवडत असतील तर हा चित्रपट तुमच्यासाठी एक मेडवाणी ठरेल.

हेही वाचा

अजय देवगण-अमृता फडणवीसांनी राबवले जुहु बीचवर स्वच्छता अभियान

हे देखील वाचा