Thursday, December 26, 2024
[aioseo_breadcrumbs]

काळ्या रंगावरून नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं वक्तव्य; रिंकू राजगुरूचं नाव घेत म्हणाला, ‘गोरी नसूनही…’

जर कौशल्य असेल, तर तुम्हाला कोणत्याही शरीरयष्टीची, देखण्या चेहऱ्याची काहीही गरज पडत नाही. हे साध्य करून दाखवणारे अनेक कलाकार आज आपल्याला बॉलिवूडमध्ये पाहायला मिळतील. त्यापैकीच एक आहे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी. नवाजुद्दीन हा त्याच्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखला जातो. तो आपले मत निर्भीडतेने मांडतो. कोणत्याही विषयी बोलताना तो कधीच मागे हटत नाही. तसेच, तो इंडस्ट्रीतील भेदभावावरही मोकळेपणाने बोलतो. इतकेच नाही, तर इंडस्ट्रीतील देखण्या अभिनेत्यांच्यामध्ये फिट बसत नसण्याबद्दलही नवाजुद्दीनचे वेगळे विचार आहेत. त्याने नुकतेच एका मुलाखतीत आपल्या रंगाबद्दल बोलताना एक मोठे विधान केले आहे. यासह त्याने रिंकू राजगुरू आणि स्मिता पाटील यांसारख्या कलाकारांचीही प्रशंसा केली.

सन 2017मध्ये एका मुलाखतीत नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) याने खुलासा केला होता की, इंडस्ट्रीत ‘वंशवादी लोकां’मुळे त्याला अनेकदा नकारांचा सामना करावा लागला आहे. नुकतेच दिलेल्या मुलाखतीत जेव्हा त्याला विचारण्यात आले की, त्याने इंडस्ट्रीत रंगामुळे होणाऱ्या समस्यांना पार केले आहे का? या प्रश्नावर अभिनेता म्हणाला की, “जर त्यांना गोऱ्या लोकांची गरज आहे, तर त्यांना माझीही गरज आहे. सध्या मला जास्त मागणी आहे. काळ्या रंगाच्या लोकांना आजही खूपच मागणी आहे. एक कॅमेरा, ज्या सुंदरतेला कैद करू शकतो, ते खूपच वेगळे आहे. ही एका प्रामाणिक प्रकारची सुंदरता आहे. जर मी कॅमेऱ्यासमोर प्रामाणिक आहे, तर प्रेक्षकांना विश्वास बसणार नाही आणि मी सुंदर दिसू लागेल.”

नवाजुद्दीनकडून रिंकू राजगुरूची प्रशंसा
पुढे बोलताना नवाजुद्दीनने बॉलिवूडच्या दोन अभिनेत्रींचीही प्रशंसा केली. तो म्हणाला की, “सैराटमध्ये रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) हिला पाहा. गोरी नसूनही सिनेमातील तिची उपस्थिती काही मिनिटातच तुम्हाला मंत्रमुग्ध करून टाकते. सिनेमा पाहताना मी एकदा वास्तवात म्हटलो होतो की, ही मुलगी किती सुंदर आहे. मी प्रामाणिकपणे मान्य करतो की, कॅमेऱ्याने स्मिता पाटील (Smita Patil) यांच्या सुंदरतेला कोणत्याही इतर भारतीय अभिनेत्रींप्रमाणे कैद केले नाही. माझ्या मते कॅमेऱ्यापुढे त्या सर्वात सुंदर अभिनेत्री होत्या. मला वाटते की, ऑनस्क्रीन सुंदरता वास्तविक आयुष्याच्या सुंदरतेपेक्षा खूपच वेगळी आहे.”

विशेष म्हणजे, नवाजुद्दीन याने हे वक्तव्य ‘नूरानी चेहरे’ या आगामी सिनेमाच्या पार्श्वभूमीवर दिले आहे. या सिनेमाची कहाणी समाजातील जुन्या सौंदर्य मानकांच्या भोवती विणलेली आहे. या सिनेमात गोऱ्या रंगासाठी लोकांची तडफडही पाहायला मिळते. या सिनेमात अभिनेत्यासोबत क्रिती सेनन हिची बहीण नुपूर सेनन (Nupur Sanon) दिसणार आहे. (actor nawazuddin siddiqui big statement on dark skinned people read what he said)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
शॉकिंग! राजपाल यादवने विद्यार्थ्याला दिली धडक, अभिनेत्याविरुद्ध तक्रार दाखल
आनंदाची बातमी! 51 वर्षांच्या वयात तिसऱ्यांदा बाप बनला ‘हा’ अभिनेता, फोटो शेअर करत दिली माहिती

हे देखील वाचा