Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘पठाण’ चित्रपटाचा पेटलाय वाद! इंदोरमध्ये जाळपोळ, सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

किंग खान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खान सध्या त्याचा आगामी येणारा चित्रपट ‘पठाण‘ चित्रपटामुळे खूपच चर्चेत आला आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग‘ हे गाणं नुकतंच प्रेक्षकींच्या भेटीला आलं असून वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. गाण्यामध्ये शाहरुख आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचे खूप इंटिमेट सीन दाखवले असून अभिनेत्रीच्या कपड्यावरुन नाही तर तिने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरुन वाद निर्माण झाला आहे. त्याशिवाया दीपिका आणि शाहरुखचे पुतळे देखिल जाळले गेले.

अभिनेता शाहरुख खान (Shaharukh Khan) मोस्ट अवेटेड ‘पठान’ (Pathan) चित्रपटाचा ट्रेलर आणि ‘बेरम रंग’ (Besharm Rang) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. काही चाहत्यांना हे गाणं आवडलं आहे, तर काहींनी या गाण्यावर वाद निर्माण केलाय. बेशरम रंग हे गाणं (दि, 12 डिसेंबर) रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलं आहे. दीपिकाने परिधान केलेली भगव्या रंगाची बिकीन काही नेटकऱ्यांना खटकली आहे. त्यामुळे चित्रपाटला बॉयकॉट करण्याची मागनी काही नेटकऱ्यांनी केली आहे.

पठाण चित्रपटाचा वाद एवढा पेटला आहे की, यामध्ये मध्ये प्रदेशचे गृमंत्री नरोत्तम यांनी देखिल चित्रपटाला ताकिद केलं आहे की,  “जर चित्रपटाती वाद निर्माण होतील असे सिन कढले नाही, तर एमपी मध्ये चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नही, याचा विचार केला जाइल.” यानंतर काही लोकांनी इंदौर शहरातील एका चौकात दीपिका आणि शाहरुखचे पुतळे देखिल जाळले गेले ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

इंदोरंधील एका चौकामध्ये काही नेटऱ्यांनी शाहरुख आणि दीपिकाच्या नावाने जोरदार नारे लावत त्यांचे पुतळे जाळून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहेत. मात्र, या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर प्रेक्षक आपली मते मांडत आहे. एका जुयरने लिहले की, “विरोध कसला करावा याचा पण विचार करावा.” दसऱ्या युजरने लिहले की, “मूर्ख लोकं आहेत हे. रंगात धर्म पाहणारे हे नीच मानसिकतेचे असतात. उद्या जर मुस्लिमांनी हिरव्या पालेभाज्या वर आक्षेप घेतलं तर हे बॉयकॉट गँग वाले काय गु खाणार काय? भगवे वस्त्रे घालून बलात्कार करणारे बाबा बुवा यांना चालतात, पण दीपिका ने भगव्या रंगाचा बिकिनी घातली की यांचा जणू धर्मच बुडतो. नीच मानसिकतेचे लोक…”, एका अन्यने लिहेले की, “रंगाला धर्माचा किंवा जातीचं लेबलं लागलं आहे. रंग ही निसर्गाची देणगी आहे, त्यावर सगळ्यांचा समान हक्क आहे. रंग ही कोणाची वयक्तिक प्रॉपर्टी नाही.”

काहींना व्हिडिओला पाठिंबा दिला आहे तर काही चाहत्यांनी यावर चांगल्या प्रतिक्रिया देखिल दिल्या आहे. मात्र, हा वाद कुठे जाऊन थांबनार आहे हे पाहणे खूपच महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘पठाण’ चित्रपटाचा पेटलाय वाद! इंदौरमध्ये जाळपोळ, सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

‘महाभारत’ या सुरेल उपक्रमातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, युट्यूबवर हाेतंय प्रचंड व्हायरल

हे देखील वाचा