तेलगू चित्रपटसृष्टीतील दिग्गज कैकला सत्यनारायण गरू यांचे शुक्रवारी (दि. 23 डिसेंबर)ला सकाळी वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले. कैकला सत्यनारायण यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक भूमिका केल्या. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. सत्यनारायण गरू यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्याचवेळी चिरंजीवीने त्याच्यासोबतचे फोटो शेअर करून एक भावनिक नोटही लिहिली आहे.
कैकला सत्यनारायण (kaikala satyanarayana ) यांचा जन्म 25 जुलै 1935 रोजी मद्रास प्रेसिडेन्सी येथे झाला. सहा दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी सुमारे 750 चित्रपटांमध्ये काम केले. मुख्यतः तेलुगु चित्रपटांमध्ये सक्रिय असणाऱ्या, सत्यनारायण गरू यांनी काही तामिळ आणि कन्नड चित्रपटांमध्येही काम केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत अभिनेत्याला ट्विट करून श्रद्धांजली वाहत म्हणाले की,”प्रसिद्ध चित्रपट व्यक्तिमत्त्व श्री कैकला सत्यनारायण गरू यांच्या निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. त्याच्या अभिनयासाठी आणि विविध भूमिकांसाठी ते अनेक पिढ्यांमध्ये खूप लोकप्रिय होते. त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांसाठी माझ्या संवेदना. ओम शांती.”
Pained by the passing away of noted film personality Shri Kaikala Satyanarayana Garu. He was popular across generations for his remarkable acting skills and diverse roles. My thoughts are with his family and admirers. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) December 23, 2022
तेलुगू इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेते चिरंजीवी यांनीही सत्यनारायण गरू यांच्यासोबतची काही फाेटाे शेअर करून तेलुगूमध्ये एक भावूक नोट लिहिली आहे. या फाेटाेंमध्ये चिरंजीवी दिवंगत ज्येष्ठ कलाकारासोबत काही क्षण घालवताना दिसत आहेत.
Rest in peace
Navarasa Natana Sarvabhouma
Sri Kaikala Satyanarayana garu ???? pic.twitter.com/SBhoGATr0y— Chiranjeevi Konidela (@KChiruTweets) December 23, 2022
राम चरण यांनी ट्विट करत लिहिले की, “कैकला सत्यनारायण गरू यांच्या निधनाने खूप दुख झाले आहे. चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.”
Deeply saddened to hear the demise of Kaikala Satyanarayana Garu..
His contribution to our film industry will be remembered forever !!
May his soul rest in peace????— Ram Charan (@AlwaysRamCharan) December 23, 2022
त्याचवेळी, महेश बाब यांनी ट्विट करत लिहिले की, “कैकला सत्यनारायण गरू यांच्या निधनाबद्दल जाणून अतिशय दु:ख झाले. त्याच्यासोबत काम करताना माझ्या काही गोड आठवणी आहेत. त्याची आठवण येईल. त्यांच्या कुटुंबियांना आणि प्रियजनांबद्दल माझ्या मनापासून संवेदना. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.”
#RIPKaikalaSatyanarayanaGaru #satyanarayana garu pic.twitter.com/sbDP4qU2hZ
— Prashanth Ane Nenu DHFM ???????????????? (@urstrulyvvs) December 23, 2022
कैकला सत्यनारायण अभिनयासोबत राजकारणातही सक्रिय होते. ते तेलुगु देसम पक्षाच्या तिकिटावर खासदार होते. ज्येष्ठ अभिनेत्याने पौराणिक पात्रे साकारली.
सत्यनारायण गरू काही काळ आजारी होते आणि त्यांनी त्यांच्या ज्युबली हिल्स हैदराबाद येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 24 डिसेंबर)ला महाप्रस्थानम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सध्या त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी निवासस्थानी ठेवण्यात आले आहे.(bollywood actor kaikala satyanarayana death veteran telugu actor dies at 87 pm modi actor chiranjeevi actor ram charan pay tribute)
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
राम-लखन पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर, ‘या’ चित्रपटात पाहायला मिळणार ‘ही’ धमाकेदार जोडी
विवेक अग्निहोत्री निघाले 5 सुरक्षा रक्षकांसह मॉर्निंग वॉकला, पाहा व्हायरल व्हिडिओ










