Saturday, September 12, 2026
Home बॉलीवूड सलमान खानची बहीण अर्पितालाही डेट करायचा अर्जुन कपूर; ‘भाईजान’ला याबद्दल समजल्यावर त्याने…

सलमान खानची बहीण अर्पितालाही डेट करायचा अर्जुन कपूर; ‘भाईजान’ला याबद्दल समजल्यावर त्याने…

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर चित्रपटांपेक्षा जास्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी चर्चेत असतो. अर्जुनने बॉलिवूडच्या बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले आहे, परंतु अद्याप तो स्वत: ला एक स्थापित कलाकार बनवू शकलेला नाही. दुसरीकडे अभिनेता त्याच्या नात्यातील बातम्यांमुळे बर्‍याचदा चर्चेत असतो. आजकाल अर्जुन अभिनेत्री मलायका अरोरासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. पण एक काळ असाही होता, जेव्हा तो सलमानची बहीण अर्पिताच्या प्रेमात पडला होता.

याचा खुलासा स्वत: अर्जुन कपूरने केला होता. अर्जुन चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी अर्पिता खानला डेट करत असायचा. अर्जुनने म्हटले होते की, “जेव्हा मला ही गोष्ट सलमान भाईला सांगायची होती, तेव्हा मला खूप भीती वाटली होती. तरीही मी त्यांना सांगितले कारण, मला वाटत होते की त्यांच्या कुटुंबाला याविषयी माझ्याकडूनच पहिल्यांदा कळावे.”

जेव्हा सलमानला अर्पिता आणि अर्जुनच्या नात्याबद्दल कळाले, तेव्हा त्याने ते अगदी शांतपणे समजून घेतले. अर्जुन म्हणाला, “या प्रकरणाबाबत कुटुंबातील सदस्यही खूप शांत होते. सलमान भाई जरा आश्चर्यचकित झाले होते, पण ते लोक आणि नात्यांबद्दल खूप काळजी घेतात.” विशेष म्हणजे अर्जुन आणि अर्पिताच्या ब्रेकअपनंतरही सलमानने अर्जुनची साथ नाही सोडली.

अर्जुन म्हणाला की, “मी निखिल अडवाणींच्या ‘सलाम-ए-इश्क ‘चित्रपटाला असिस्ट करत होतो. त्यावेळी माझे वजन सुमारे 140 किलो होते. मला एक गर्लफ्रेंड होती आणि माझे कामकाजही व्यवस्थित चालू होते, म्हणून मला वाटले की माझे आयुष्य योग्य दिशेने जात आहे. तथापि, माझा ब्रेकअप झाल्यानंतर, माझ्या आयुष्यात गोंधळ उडायला लागला.”

पुढे अर्जुनने सांगितले होते की, “ब्रेकअप झाल्यानंतरही सलमानने माझी साथ सोडली नाही आणि नेहमीच माझ्यासाठी मोठ्या भावासारखे उभे राहिले. मोठा भाऊ असल्याचा अर्थ काय, हे त्यांनी मला समजवून दिलं.” अर्पिताला डेटिंग करताना अर्जुन केवळ 18 वर्षांचा होता आणि त्यांचे नाते जवळपास 2 वर्ष टिकले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भारतीय क्रिकेटर रिषभ पंतसोबत जोडलं गेलं अभिनेत्री उर्वशी रौतेलाचं नाव, म्हणाली, ‘मी कोणत्याही क्रिकेटपटूला…’

-नुसता राडा! राजामौली यांच्या ‘या’ चित्रपटाने रिलीझपूर्वी केली ९०० कोटी रुपयांची कमाई, ‘बाहुबली’लाही टाकले मागे

-बिग बी आणि ‘नॅशनल क्रॅश’ रश्मिका दिसणार ‘या’ आगामी चित्रपटात, सुरू झाली चित्रपटाची शूटिंग

हे देखील वाचा