Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

ऐश्वर्या शेर, तर लेक सव्वाशेर! उंचीमध्ये थेट आईला टक्कर देतेय आराध्या, व्हिडिओ पाहून उंचावतील भुवया

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन ही जोडी बॉलिवूडमधील सर्वात रोमँटिक जोड्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. हे दोघेही त्यांच्या व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असतातच. तसेच, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीही चांगलीच चर्चा रंगलेली असते. अशात अभिनेत्री ऐश्वर्या तिची मुलगी आराध्या बच्चन हिच्यामुळे चर्चेत आली आहे. आराध्या नुकतीच 11 वर्षांची झाली आहे. तिचा जन्म 16 नोव्हेंबर, 2011 रोजी मुंबईच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात झाला होता. आराध्या दरदिवशी तिची आई ऐश्वर्यासोबत स्पॉट होत असते. अशात तिचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, जो भलताच व्हायरल होत आहे.

खरं तर, इंस्टाग्रामवर एका प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफरने ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि आराध्या बच्चन (Aaradhya Bachchan) यांचा हा व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ अजूनही इंटरनेटवर राडा करताना दिसत आहे. या व्हिडिओवर चाहते प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. तसेच, कमेंट्स करत आराध्याची प्रशंसा करत आहेत. या व्हिडिओत ऐश्वर्या आणि आराध्या (Aishwarya And Aaradhya) दिसत आहेत आणि शेवटी अभिषेक बच्चनही (Abhishek Bachchan) दिसत आहे.

आईच्या खांद्यापेक्षा उंच आराध्या
हा व्हिडिओ विमानतळावरील आहे. यामध्ये अभिषेक कुटुंबासोबत दिसत आहे. या व्हिडिओत आराध्या तिच्या वडिलांप्रमाणे दिसत आहे. तसेच, उंचीमध्ये ती आई ऐश्वर्याच्या खांद्यापेक्षाही उंच झाली आहे आणि ती तिचा हात धरून चालत आहे. या व्हिडिओवर कमेंट करत एकाने कमेंट केली की, “आराध्या आता मोठी झाली आहे. तिचा हात सोडून दे. तिला एकटीला चालू दे.” दुसऱ्या एकाने कमेंट केली की, “आराध्याची केशभूषा बदला, तिला ती शोभत नाहीये.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

ऐश्वर्याच्या कामाविषयी बोलायचं झालं, तर ती नुकतीच ‘पोन्नियिन सेल्वन’ सिनेमाच्या पहिल्या भागात दिसली होती. यामध्ये तिच्या अभिनयाची जोरदार प्रशंसा करण्यात आली होती. दुसरीकडे, अभिषेकच्या कामाविषयी बोलायचं झालं, तर तो शेवटचा ‘दसवीं’ या सिनेमात झळकला होता. यामध्ये त्याच्यासोबत यामी गौतम हिने भूमिका बजावली होती. अभिषेकच्या या सिनेमाला ‘फिल्मफेअर सर्वोत्तम ओटीटी अभिनेता’ हा पुरस्कारही मिळाला आहे. (aaradhya bachchan giving competition to mother aishwarya rai in height and looks like father abhishek bachchan see video)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘लस्ट स्टोरीज’मध्ये इंटीमेट सीनमुळे घाबरलेली भूमी; म्हणाली, ‘लोकांनी भरलेल्या खोलीत माझ्या शरीरावर…’
तुनिषा शर्माच्या कुटुंबियांना भेट दिल्यानंतर रामदास आठवलेंनी केली ‘ही’ मागणी

हे देखील वाचा