कलाकार त्यांच्या आयुष्यात विविध भूमिका साकारत असतात, मात्र काही कलाकारांच्या नशिबात अशी एक तरी भूमिका असते जी त्यांना आयुष्यभरासाठी ओळख देऊन जाते. असाच एक सिनेमा म्हणजे करण जोहर दिग्दर्शित ‘कुछ कुछ होता हैं’. या सिनेमाने लोकप्रियतेच्या बाबतीत अनेक मोठे रेकॉर्ड प्रस्थापित केले. या सिनेमाने शाहरुख खान, काजोल, राणी मुखर्जी, अनुपम खेर, अर्चना पुरण सिंग यांच्यासोबतच सिनेमात असणाऱ्या बालकलाकाराला देखील अमाप लोकप्रियता मिळवून दिली. या चित्रपटात शाहरुख आणि राणी मुखर्जी यांच्या मुलीची अंजलीची भूमिका साकारणाऱ्या लहान मुलीने तर सर्वच लोकांची मने जिंकली. उत्तम अभिनय, निरागस चेहरा असणाऱ्या या बालकलाकारने मोठे नावलौकिक मिळवले. आजही या सिनेमाचे नाव उच्चारले तरी त्या लहान मुलीचा चेहरा समोर येतो. ही भूमिका साकारली होती, अभिनेत्री सना सईदने.
सनाने कुछ कुछ होता है सिनेमानंतर स्टुडंट ऑफ द इयर सिनेमात देखील भूमिका साकारली. मात्र तिला अभिनयात अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र सोशल मीडियावर सनाची तुफान फॅन फॉलोविंग आहे. आपल्या बोल्ड इमेजमुळे सना नेहमीच लाइमलाईट्मधे असते. मात्र आता सना चर्चेत येण्याचे करण खूपच खास आहे. नुकताच सनाने साखरपुडा केला आहे. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये तिने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावरून सर्वांना सांगितली. सनाने तिचा विदेशी प्रियकर असणाऱ्या साबा वॉनरसोबत हा साखरपुडा केला आहे.
View this post on Instagram
सनाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तिचा प्रियकर साबा तिला गुडघ्यावर बसून रिंग घेऊन प्रपोज करताना दिसतो. त्यानंतर सनाने लगेच त्याला होकार दिला आणि मिठी मारली. या व्हिडिओमध्ये सनाने काळ्या रंगाचा बोल्ड गाऊन घातलेला दिसत आहे, तर साबाने देखील काळ्या रंगाचा ड्रेस घातलेला दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सनाने तिची रिंग देखील फ्लॉन्ट केली. तत्पूर्वी मागील बऱ्याच काळापासून सना आणि साबा एकमेकांना डेट करत होते. सनाच्या या सुंदर आनंदाच्या प्रसंगानंतर तिचे फॅन्स आणि इंडस्ट्रीमधील तिचे मैत्रमैत्रिणी देखील तिला शुभेच्छा देताना दिसत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कडक! शिवानी बावकरचे फोटो पाहून लागिर झालं जी
रश्मी देसाईचा हटके लूक! चाहत्यांना पाडतोय भुरळ, पाहा फोटो गॅलरी










