सन 2022 हे वर्ष अखेर संपल. या वर्षाने आपल्याला OTTवर अनेक मनोरंजक वेब सीरिज दिल्या. त्यातील या आहेत काही 2022च्या सर्वोत्कृष्ट वेब सीरिज ज्या तुम्ही अजुनही पाहिल्या नसतील तर लवकर पाहा.
दिल्ली क्राइम – सीझन 2
दिल्ली क्राइमचा सीझन 2 (Delhi crime 2) नेटफ्लिक्सवर 26ऑगस्टला रिलीज झालेला. रिलीजनंतर अवघ्या काही तासांतच या सीझनने धुमाकूळ घातला. दिल्ली क्राइमच्या सीझन 2मध्ये 80 च्या दशकात झालेल्या चड्डी बनियन गँगचे गुन्हे उलगडण्यात आले आहेत.
जमतारा – सीझन २
जमतारा – सबका नंबर आएगा (Jamtara) या वेब सीरिजची कथा एका लहान मुलांभोवती फिरते, जो फिशिंग स्कॅमद्वारे भरपूर पैसे कमावतो. या सिरीजद्वारे पोलिस आणि घोटाळ्यांमधली राजकारणाची भूमिका प्रेक्षकांना चांगल्या प्रकारे समजावून सांगण्यात आली आहे. जमताराचा पहिला सीझन प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाला होता. जमतारा २ ही सिरीज तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
पंचायत
तिसरी वेब सीरिज म्हणजे पंचायत (Panchayat). उत्तर प्रदेशातील एका छोट्याशा गावावर आधारित ही सिरीज ग्रामपंचायत कार्यालयात काम करणाऱ्या आणि यूपीएससीसाठी इच्छुक असलेल्या एका व्यक्तीच्या जीवनावर भाष्य करते. पंचायत सीझन 2 ही सिरीज तुम्ही Amazon Primeवर पाहू शकता.
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने वच्या 43 व्या वर्षी दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, थाटामाटात पार पडला लग्नसोहळा
दीपिका पदुकोणचा मॉर्निंग लूक! शेअर केल्या स्किन केअरसाठी 5 महत्वाच्या टीप्स