चित्रपट अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीचा संयम तुटताना दिसत आहे. नुकताच रविवारी (११ मार्च) त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे, त्यात तो दिग्दर्शक शकुन बत्रावर हल्ला करताना दिसला आहे. सिद्धांत चतुर्वेदी लवकरच दिग्दर्शक शकुन बत्रासोबत काम करताना दिसणार आहे. पण तो शकुन बत्रावर चिडला असल्याचे दिसत आहे, कारण तो त्याला चित्रपटाचे नाव सांगत नव्हता. सोशल मीडियावर त्यांचा हा मजेेशीर व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
यामध्ये सिद्धांत चतुर्वेदीने पांढरा शर्ट आणि काळी पँट परिधान केली आहे. याव्यतिरिक्त शकुन बत्राने गुलाबी शर्ट आणि हिरव्या रंगाचे शॉर्ट्स घातले आहेत.
व्हिडिओमध्ये सिद्धांत शकुनला विचारत आहे की, त्याच्या चित्रपटाचे नाव काय आहे. यावर शकुन म्हणतो की, त्याने ते अद्याप ठरवले नाही. त्यानंतर सिद्धांत चतुर्वेदी शकुन बत्राला पकडतो आणि बिन बॅगवर टाकतो. यामुळे शकुन त्याला लाथ मारतो. हा व्हिडिओ शेअर करत सिद्धांतने लिहिले आहे, “आणखी एक अयशस्वी प्रयत्न. जोपर्यंत मला शकुन बत्राच्या चित्रपटाचे नाव कळत नाही.”
आता कॅटरिना कैफनेही या व्हिडिओवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तिने लिहिले, “ओह नो.” सिद्धांतचे चाहतेही या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत आणि चित्रपटाच्या शीर्षकाची मागणी करत आहेत.
शकुन बत्रा लवकरच त्याच्या आगामी चित्रपटात दीपिका पदुकोण आणि अनन्या पांडे यांच्यासमवेत दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग गोवा आणि मुंबई येथे झाले आहे. सिद्धांत चतुर्वेदी बऱ्याच चित्रपटांमध्ये दिसला आहे. त्याच्या भूमिकांनाही चांगलीच पसंती मिळाली आहे. तो एक जलद गतीने उभरणारा कलाकार आहे. त्याने रणवीर सिंगसोबत ‘गली बॉय’ चित्रपटात देखील काम केले आहे. याव्यतिरिक्त शकुन बत्रा हा चित्रपट दिग्दर्शक आहे. त्याने बर्याच कलाकारांसोबत काम केले आहे. तो अनेकदा करण जोहरच्या घरगुती पार्टीतही स्पॉट केला जातो.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-नया है यह! झरीन खानने दाखवले ‘डोन्ट रश’चे नवीन व्हर्जन, पाहा अभिनेत्रीचा जबरदस्त व्हिडिओ