Friday, October 17, 2025
Home बॉलीवूड ‘…उर्वशीच्या बॉलिवूड करियरइतकेच फाटले आहे’, उर्वशी रौतेला फाटलेल्या ड्रेसमुळे झाली ट्रोल

‘…उर्वशीच्या बॉलिवूड करियरइतकेच फाटले आहे’, उर्वशी रौतेला फाटलेल्या ड्रेसमुळे झाली ट्रोल

सिनेसृष्टीमधे काम करणाऱ्या कलाकारांचे सतत वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. या कलाकारांकडे मीडियाचे आणि त्यांच्या फॅन्सचे सतत डोळे असतात. कलाकार कुठे चुकताय हे किंवा त्यांनी काय चुकीचे केले हे बघणे आणि ते पाहण्यात त्यांना मजा येते आणि मग त्यावरून त्यांना ट्रोल केले जाते. अशा ट्रोलिंगचा सामना सगळेच कलाकार करतात. सध्या या प्रकारच्या ट्रोलिंगला अभिनेत्री उर्वशी रौतेला सामोरी जात आहे.

बॉलिवूडमधील हॉट अँड ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून उर्वशी रौतेला ओळखली जाते. कमी चित्रपटांमध्ये काम करूनही उर्वशीने तिच्या सौंदर्याने आणि तिच्या आकर्षक व्यक्तिमत्वाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. उर्वशीने तिच्या मेहनतीने बॉलिवूडमध्ये कोणताही पाठिंबा नसताना मोठी झेप घेतली. मात्र सध्या हीच उर्वशी मोठ्या ट्रोलिंगला सामोरी जात आहे. नुकतेच उर्वशीला एयरपोर्टवर पाहिले गेले. आता तिला तिच्या एयरपोर्ट ड्रेसवरून मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे. उर्वशीने लाल रंगाचा थाई हाय वन पीस ड्रेस घातला होता. यासोबत तिने काळ्या रंगाची प्रिंटेड स्टॉकिंग देखील घातली होती. मात्र या स्टॉकिंग वरून ती आता सर्वांचे हसू बनली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

उर्वशी रायतेलाने एयरपोर्टवर ड्रेस खाली घातलेली स्टॉकिंग फाटली होती, आणि त्याचमुळे तिच्याकडे लोकांचे लक्ष गेले. आता तिचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून, लोकांनी तिला नीट आणि न फाटलेले कपडे घालण्याचा सल्ला दिला. एकाने विचारले, “हे लोकं सॉक्स फाटल्यानंतर बदलत नाही का?” दुसर्याने विचारले की, “असे स्टॉकिंग कसे काय फाटले?”, अजून एकाने कमेंट्समध्ये लिहिले, “स्टॉकिंग उर्वशीच्या बॉलिवूड करियरइतकेच फाटले आहे.” एकाने लिहिले, “कदाचित उर्वशीची ही आवडती स्टॉकिंग असेल, म्हणून फाटली असूनही ती स्टॉकिंग फेकत नाही.”

याआधी उर्वशी रिषभ पंतचा अपघात झाल्यानंतर चर्चेत आली होती. उर्वशीने आता पर्यंत अनेक चित्रपटांमध्ये आणि म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अरे बापरे! फराह खान होती करण जोहरच्या प्रेमात, तांत्रिक अडचण सांगत ‘त्याने’ नाकारला प्रस्ताव

पतीच्या ‘या’ गोष्टीला कंटाळलेली फराह खान लग्नाच्या एका वर्षातच जाणार होती पळून, वाचा रंजक किस्सा

हे देखील वाचा