Monday, October 27, 2025
Home बॉलीवूड राखी सावंत अन् आदिलचा लिपलॉक व्हिडिओ व्हायरल; लोक म्हणाले, ‘इस्लामची राजकुमारी’

राखी सावंत अन् आदिलचा लिपलॉक व्हिडिओ व्हायरल; लोक म्हणाले, ‘इस्लामची राजकुमारी’

एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंतने नुकतेच आदिल खान सोबतच्या लग्नाचे रहस्य उघड केले आहे. सात महिन्यांपूर्वी आदिलसोबत लग्न झाल्याचे तिने सोशल मीडियावर सांगितले. एवढेच नाही तर तिने इस्लाम धर्म स्वीकारला आणि आपले नावही बदलले. जिथे काही लोकांनी राखीच्या निर्णयाचे स्वागत केले, तर काहींनी तिच्यावर टीका केली. मात्र, बिनधास्त आयुष्य जगणारी राखी टीकाकारांकडे दुर्लक्ष करत आदिलसोबत आयुष्याची नवी सुरुवात एन्जॉय करत आहे. तिने आदिल खानसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघेही लिप लॉक करत आहेत.

राखी सावंत (rakhi sawant) हिने अलीकडेच तिचा आदिल खान (adil khan) सोबतच्या लग्नाचा खुलासा केला. तिने सांगितले की, “जुलै 2022 मध्ये आदिल खानसोबत कोर्ट मॅरेज झाले होते. मात्र, आत्तापर्यंत ही गोष्ट मीडियामध्ये लपवून ठेवण्यात आली होती. कारण, आदिलला लग्न गुप्त ठेवायचे होते.” राखीने सात महिन्यांनंतर लग्नाचा जाहीर खुलासा केला. मात्र, आदिलने यावर काहीही बोलण्यास नकार दिला. अशातच राखीचा आदिल खानसोबतचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोघेही रोमँटिक पोज देताना दिसत आहेत. राखीचा हा व्हिडिओ जुना आहे, जो सध्या जास्त व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

राखी सावंतने ब्रँड फोटोशूटदरम्यानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती आणि आदिल एकमेकांसाेबत रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. त्यानंतर दोघांनी कॅमेऱ्यासमाेर लिप लॉक केले आणि त्यांचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला. व्हिडिओमध्ये राखीने ऑफ शोल्डर, थाई हाय स्लिट गाऊन घातला आहे. त्यासोबत हेवी मेकअप आणि सिल्व्हर हील्सही घातल्या आहेत. तर, आदिलने काळ्या रंगाची कोट पँट घातला आहे.

राखी आणि आदिलचा हा व्हिडिओ अनेक चाहत्यांनी लाइक केला आहे. राखीच्या अनेक चाहत्यांनी तिला तिच्या नव्या सुरुवातीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काहींनी त्यांना न्यू मुस्लिम कपल म्हटले, तर काहींनी तिला इस्लामची राजकुमारी म्हटले आहे. (tv actress rakhi sawant shares liplock video with adil khan durrani after marriage change her name to fatima)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अहो! कुन्या गावाचं आलं पाखरू? बसलंय डौलात न् खुदुखुदू हसतंय गालात

‘वेड’ चित्रपटाने रचलांय नवा विक्रम! चित्रपटाच्या टीमसोबत रितेश अन् जिनेलियने घातला धुमाकुळ

हे देखील वाचा