Saturday, May 2, 2026
Home टेलिव्हिजन बिग बाॅसमधील पुरुष स्पर्धकांनी केलं मुलीचं रुप धारण, पाहून महिला स्पर्धकांनाही बसेल धक्का

बिग बाॅसमधील पुरुष स्पर्धकांनी केलं मुलीचं रुप धारण, पाहून महिला स्पर्धकांनाही बसेल धक्का

बिग बॉस 13‘ नंतर सोशल मीडियावर कोणत्या सीझनची सर्वाधिक चर्चा होत असेल तर ती या सीझनची. शोला तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे आणि घरामध्ये राहिलेल्या प्रत्येक स्पर्धकाचे लक्ष आता शोच्या ट्रॉफीकडे आहे. बिग बॉसमध्ये महिला स्पर्धकांना त्यांचे सुंदर रूप दाखवण्यासाठी वारंवार काही ना काही टास्क देण्यात येत असते. पण तुम्हाला माहीत आहे का की, घरातील महिला स्पर्धकही साजिद खानच्या ब्वाॅयज टिम समोर फीमेल वर्जनमध्ये अपयशी ठरल्या आहेत.

बिग बॉसशी संबंधित काेणता ना काेणता व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. अशात नुकताच एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. रुबिना आणि अभिनव रुबिनव यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये त्याने साजिद खानच्या टीममधील मुलांचे मुलींमध्ये रूपांतर केले आहे. केवळ मुलंच नाही तर निम्रित कौर अहलुवालिया आणि सुंबूल तौकीर खान यांनीही ते मुलं असते तर कसे दिसले असते याचा व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओमध्ये साजिद खान व्यतिरिक्त अब्दू, शिवा आणि एमसी स्टेनची फीमेल वर्जन आहे.

सोशल मीडियावर एमसी स्टेन, शिव, अब्दू आणि साजिदचे फीमेल व्हर्जन पाहून लोक सोशल मीडियावर मजेदार प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका युजरने “अब्दू सर्वात गोंडस मुलगी दिसत आहे आणि निमृत सर्वात सुंदर मुलगा दिसत आहे”, अशी कमेंट केली. तर दुसर्‍या युजरने लिहिले की, “स्टॅन, शिव आणि अब्दू खूप सुंदर महिला दिसत आहेत. निम्मी देखील एक मुलगा म्हणून खूप देखणी आहे.” एका युजरने चक्क कमेंट करत लिहिले की, “शिव बिपाशा बसूच्या फीमेल व्हर्जनसारखा दिसतोय.” साजिद खानच्या फोटोवर कमेंट करताना आणखी एका युजरने लिहिले की, “साजिद फराहचे फीमेल व्हर्जन वाटत आहे.”

मागच्या आठवड्यात बिग बॉसमध्ये नॉमिनेशन पाहिले गेले, जिथे तीन स्पर्धकांना 1 आठवड्यात घरातून बाहेर काढण्यात आले. श्रीजीता डे यांच्यानंतर अब्दू रोजिक आणि साजिद खान यांनीही शोचा निरोप घेतला. बिग बॉसने साजिद खानच्या हकालपट्टीने सर्वांना आश्चर्यचकित केले (tv `show bigg boss 16 mc stan to abdu rozik sajid khan and shiv thakare turn into a beautiful girls watch viral video )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘त्यावेळी दीपिकाने मला खूप साथ दिली…’ हनी सिंगचा धक्कादायक खुलासा

चिन्मय मांडलेकर पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला, आलंय माझ्या राशीला चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

हे देखील वाचा