Monday, June 23, 2025
Home बॉलीवूड खबरदार! आमिर खानच्या मुलीचे नाव चुकीचे घ्याल, तर भरावा लागेल ५००० रुपये दंड, व्हिडिओ शेअर करत म्हणाली…

खबरदार! आमिर खानच्या मुलीचे नाव चुकीचे घ्याल, तर भरावा लागेल ५००० रुपये दंड, व्हिडिओ शेअर करत म्हणाली…

बॉलिवूडचा ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ आमिर खानची मुलगी आयरा खान ही सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत तिच्या चाहत्यांशी संपर्क साधत राहते. आयराचे नाव बरेचजण चुकीचे लिहितात किंवा उच्चारतात. अशा व्यक्तींवर तिने सोशल मीडियावर राग व्यक्त केला आहे. एवढंच नाही तर तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. त्यात तिने सांगितले की, यापुढे जो कोणी तिचे नावं चुकीचे घेईल त्यांना 5000 रुपये दंड द्यावा लागेल.

आमिर खानच्या मुलीने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओला‌ आतापर्यंत 57 हजारांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. आमिर खानची मुलगी आयरा खान हिने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “बाकीचे सगळे मला इरा म्हणतात म्हणून माझे मित्र मला खूप चिडवतात. त्यामुळे मी असे ठरवले की, आता सगळ्यांना सांगायचे की, माझे नाव आयरा खान हे आहे. जर मला इथून पुढे कोणी इरा नावाने आवाज दिला, तर त्याला 5000 रुपये दंड द्यावा लागेल. हे रुपये मी महिन्याच्या किंवा वर्षाच्या शेवटी दान करत जाईल. न्यूज पेपर, मीडिया सर्वांना सांगत आहे की, माझे नाव आयरा‌ हे आहे.”

हा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले की, ‘आयरा म्हणजेच eye – Ra’ याआधी सगळेजण तिचे नाव इरा असे लिहित असायचे. आमिर खानची मुलगी आयरा‌‌ खान ही देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती भलेही बॉलिवूडमधील अनेक गोष्टींपासून लांब आहे पण अनेकवेळा ती तिच्या फोटो आणि व्हिडिओमुळे चर्चेत असते.

याआधी आयराने एक व्हिडिओ शेअर केला होता यामध्ये तिने तिचे डिप्रेशन आणि तिच्या आई- वडिलांचा घटस्फोट या बाबत भाष्य केले होते. तिने सांगितले की, “मी डिप्रेशनमध्ये आहे, पण मी ड्रग्ज नाही घेत. मी स्वतःला नुकसान नाही पोहोचू देत. दारू देखील मी जास्त पित नाही. कॉफी पण जास्त पित नाही. माझे डिप्रेशन या प्रकारे काम नाही करत.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कोरोना विषाणूला गंभीरतेने न घेता जुहू बीचवर लोकांची गर्दी, अभिनेत्रीने ट्वीटमार्फत केली लॉकडाऊनची मागणी

-‘संधी मिळेल तिथे डान्स करा!’, केरळच्या मेडिकल स्टुडंट्सनी लावले ‘या’ गाण्यावर ठुमके, पाहा जबरदस्त व्हिडिओ

-एकदम कडक! ‘टॉप टकर’ गाण्यावर थिरकली ‘नॅशनल क्रश’, वाढदिवसानिमित्त व्हिडिओची सोशल मीडियावर धमाल

हे देखील वाचा