मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या खुलाश्यानंतर महाराष्ट्रातील वातावरण तापले आहे. परमबीर सिंग यांना खंडणी प्रकरणी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप लागले होते. यावर त्यांनी सोमवारी (5 एप्रिल) मुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. यांच्या राजीनाम्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने देशमुखांवर निशाना साधला. कंगना ही अनेक सामाजिक आणि राजकीय बाबीत तिचे मत मांडताना दिसते. त्यामुळे तिला अनेक वेळा ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. तिने देशमुखांबद्दल लिहिले की, ही तर फक्त सुरुवात आहे, पुढे पाहा काय होतं.
यावर एका युजरने कंगनाच्या व्हिडिओचा एक भाग ट्वीट करून बीएमसीने तोडफोड केल्याप्रकरणी ती मुख्यमंत्र्यांना संबोधित करत म्हणते आहे की, “काळ प्रत्येकाचा येतो. आज माझं घर तुटलं आहे, उद्या तुझा गर्व तुटेल.”
https://twitter.com/KanganaTeam/status/1379010802720514051
कंगनाने या ट्विटला रिट्विट करत लिहिले आहे की, “जो साधूंची हत्या करतो आणि स्त्रियांचा अपमान करतो त्याचा शेवट निश्चित आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. पुढे पुढे पाहा काय होतं.” यात कंगनाने अनिल देशमुख आणि उद्धव ठाकरे हे हॅशटॅग वापरले आहेत. मागच्या वर्षी बीएमसीने कंगणाच्या पाली हिल इथे असणाऱ्या ऑफिसला बेकायदेशीर बांधकाम आहे, असं म्हणून त्याची तोडफोड केली होती. त्याबाबत कंगनाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने कंगनाच्या बाजूने निकाल लावत, उच्च न्यायालयाने कंगनाच्या बाजूने निकाल लावत याला सुडाची कारवाई, असे म्हटले आहे.
कंगनाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिचा ‘थलायवी’ हा चित्रपट 23 एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ती तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ झाला आहे. यावर तिला खूप लाईक्स मिळत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-फक्त २५० रुपये होता ‘दयाबेन’चा पहिला पगार; रक्कम मिळताच ठेवली होती ‘या’ व्यक्तीच्या हातावर
-यो यो हनी सिंगने केला आई- वडिलांचा वाढदिवस साजरा, फोटोला मिळाले ४ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स










