Monday, June 23, 2025
Home बॉलीवूड मोठी बातमी! बॉलिवूडमधील ज्येष्ठ चित्रपट निर्माता महेश भट्ट यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया, प्रकृती गंभीर…

मोठी बातमी! बॉलिवूडमधील ज्येष्ठ चित्रपट निर्माता महेश भट्ट यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया, प्रकृती गंभीर…

बॉलिवूड इंडस्ट्रीमधली ज्येष्ठ दिग्दर्शक चित्रपट निर्माता आणि लेखक महेश भट्ट यांच्या तब्येत विषयी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. महेशजींवर नुकतंच हृदयाची शस्त्रक्रिया झाली असल्याने त्यांची तब्येत गंभीर आहे. त्यामुळे भट्ट कुटुंबीय खूप चिंतेत आहे. त्याशिवाय बॉलिवूड इंडस्ट्रीमधील ही बातमी पसरल्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी आजपर्यत अनेक गाजणारे चित्रपट इंडस्ट्रीला दिले आहेत.

महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांनी आपलं आयुष्य बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये घातलं आहे. नुकतंच त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली आहे त्यामुळे त्यांची तब्येत गंभीर आहे. गेल्या महिन्यात त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात घेऊन गेले होते त्यावेळी त्यांच्या हृदयाची तपासणी करण्यात आली होती. यानंतर त्यांना लवकरच शस्त्रक्रियेची गरज भासू लागल्याने त्यांची अँजिओप्लास्टी झाली आहे.

माध्यमांशी संवाद साधत असताना महेश भट्ट यांचा मुलगा राहुल भट्ट (Rahul Bhatt) याने सांगितले की, “या आठवड्याच्या सुरुवातीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ‘ऑल इज वेल दॅट एन्ड वेल. ते (महेश भट्ट) आता ठीक आहे आणि घरी परतले आहे. मी तुम्हाला जास्त माहिती देऊ शकत नाही, कारण हॉस्पिटलमध्ये अनेक लोकांना जाण्याची परवानगी नव्हती.”

 

View this post on Instagram

 

दिग्दर्शक महेश भट्ट यांनी वयाच्या 26 व्या वर्षी ‘मंजिले और भी’ चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली होती. 1974 साला पासून चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यात सुरुवात केली होती. 1984 मधील ‘सारांश’ हा त्यांचा सर्वात लोकप्रिय चित्रपट होता, जो 14 व्या मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला होता.

आज महेश भट्ट यांना कोणत्यही ओळखीची गरज नाही त्याशिवाय बॉलिवूडमध्ये त्यांची गणना टॉप चित्रपट निर्मात्यांपैकी केली जाते. त्यांचे विशेष फिल्म्स नावाचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस देखील आहे. सध्या त्यांच्याकडे अनेक चित्रपटांच काम आहे, त्यामुळे लवकरात लवकर बरे होऊन इंडस्ट्रीमध्ये पुनरागमन करतील अशी आशा दर्शवली जात आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

चित्रपट प्रेमिंसाठी खुशबर! ‘सिनेमा लव्हर्स डे’ निमित्त खास ऑफर, चित्रपट पहा फक्त 99 रुपयात

लहान असताना शिल्पा शेट्टीला ‘या’ कारणामुळे वाटायचा बहीण शमिता शेट्टीचा मत्सर

हे देखील वाचा