Monday, June 23, 2025
Home बॉलीवूड आजपासून सुरु होणार अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या लग्नाचे प्रीवेडिंग फंक्शन

आजपासून सुरु होणार अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या लग्नाचे प्रीवेडिंग फंक्शन

मागील बऱ्याच काळापासून सुनील शेट्टीची मुलगी आणि अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांच्या लग्नाच्या बातम्या येत आहेत. हे दोघेही मागील बरीच काळापासून एकमेकांना डेट करत असून, आता ते लग्नबंधनात अडकणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्यांच्या लग्नाबद्दल अजून काहींची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तत्पूर्वी मीडिया रिपोर्ट्सनुसार आजपासून अर्थात २१ जानेवारीपासून त्यांच्या लग्नाच्या आधीचे सर्व फंक्शन सुरु झाले आहेत. मिळणाऱ्या माहितीनुसार २३ जानेवारीला अथिया आणि राहुल लग्न करणार आहे.

प्राप्त माहितीनुसार अथिया आणि केएल राहुल यांचे लग्न सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील आलिशान बंगल्यावर होणार आहे. माहितीनुसार २२ जानेवारी रोजी मेहंदीचे फंक्शन पार पडणार आहे. या लग्नात खूप जास्त फंक्शन न होता मोजके आणि महत्वाचे फंक्शनचं फक्त होतील. येणाऱ्या २३ जानेवारी रोजी अथिया आणि राहुल केवळ १०० लोकांच्या उपस्थितीत लग्न करणार आहेत. येणाऱ्या सर्व पाहुण्यांना विनंती देखील केली गेली आहे की, कोणीही लग्नात फोटो काढू नये आणि सोशल मीडियावर फोटो पोस्ट करू नये. सर्वांनी त्यांचे फोन दूर ठेवावे. या लग्नात क्रिकेट आणि मनोरंजनविश्वातून अनेक सेलिब्रिटी देखील पोहचणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

एका माहितीनुसार राहुलच्या क्रिकेटमधील व्यस्त वेळापत्रकामुळे मे महिन्यात आयपीएल संपल्यानंतर सिनेविश्व आणि क्रिकेट जगतासाठी एका मोठ्या पार्टीचे आयोजन केले जाईल. या लग्नासाठी काही पाहुणे आजपासूनच पोहचणार आहे. अथिया आणि राहुल यांच्या लग्नाच्या अधिकृत घोषणेआधीच मीडियाला याबद्दल माहिती मिळाल्यामुळे लग्नाच्या ठिकाणी मीडियासाठी खास जागा ठेवण्यात आली आहे.

दरम्यान अथिया आणि राहुल यांची पहिली भेट एका मित्राकडून कडून झाली. लवकरच ते चांगले मित्र झाले आणि यानंतर प्रेमात पडले. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी आता लग्नाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी त्यांचे नाते जगापासून लपवून ठेवले होते, मात्र नंतर ते मान्य केले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अखेर निरोपाची वेळ आलीच…माझी तुझी रेशीमगाठ मालिकेचा ‘या’ दिवशी प्रसारित होणार शेवटचा भाग

ब्रेकिंग! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्यााल अटक, अभिनेत्रीला त्रास आणि अश्लील मेसेज पाठवण्याचा लावला आरोप

`

हे देखील वाचा