बॉलिवूडची धक धक गर्ल अर्थातच माधुरी दीक्षित आणि सलमान खान यांची जोडीने तर प्रेक्षकांना वेडच लावले होते. या त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र कामे केले होते. 1991 साली ‘साजन‘ चित्रपटामध्ये या जोडीने पहिल्यांदा एकत्र काम केले असून सलमान आणि माधुरीची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. यानंतर त्यांनी ‘हम आपके है कौन?‘ या चित्रपटामध्ये काम केल्यानंतर या जोडीला डोक्यावर घेतले असून चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. त्यावेळी यांची जोडी तुफान गाजली होती. यापूर्वी देखिल या दोघांनी 1993 साली दिल तेरा आशिक या चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते मात्र, ‘हम आपके है कौन’ मध्ये त्यांना अमाप प्रसिद्धा लाभली होती.
सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेत्री माधुरी दीक्षिता (Madhuri Dixit Nene) यांचे लागोपठ चित्रपट आले आणि प्रेक्षकांच्या मनात घरा करुन गेले. सलमान आणि माधुरीच्या जोडीला हम साथ साथ है (Hum Saath – Saath Hain) या चित्रपटासाठी देखिल ऑफर आली होती मात्र, माधुरीने एका सीनमुळे या चित्रपटाला चक्क नकार दिला आणि हा चित्रपट अभिनेत्र तब्बू (Tabbu) हिच्या झोळीत पडला. पण माधुरीने या चित्रपटाला नकार का दिला असा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल.
एका मुलाखतीदरम्यान माधुरीने ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाला नकार देण्यामागचं कारम सागितलं होतं. या चित्रपटासाठी माधुरीला सलमान खानच्या वहिनीची भूमिका साकारण्याची ऑफर आली होती. मात्र, माधुरीने ती भूमिका करण्यास नकार दिला. त्यामागचं कारण सांगत असताना माधुरी म्हणाली की, “हम साथ साथ है चित्रपटाचे दिग्दर्शक सुरज बजडात्या यांना मला या चित्रपटासाठी कास्ट करायचे होते, पण कोणत्या भूमिकेसाठी याबाबत बराच गोंधळ सुरु होता. मी करिश्मा कपूर (Karishma Kapoor) किंवा सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) यांनी साकारलेल्या भूमिका साकारू शकत नव्हते. कारण त्याआधी सलमान आणि माझा ‘हम आपके हैं कौन’ (Hum Apke Hain Kon?) सुपरहिट ठरला होता त्यामुळे सूरजजींच्या चित्रपटामध्ये माझी भूमिका त्याहून चांगली असणं अपेक्षित होतं.”
View this post on Instagram
माधुरी पुढे म्हणाली, “मला एक पाऊल मागे येऊन कोणतीही भूमिका साकारायची नव्हती. बरीच चर्चा झाल्यानंतर त्यांनी मला तब्बूने साकारलेली भूमिका ऑफर केली. ज्यात एक सीन होता की सलमान खान त्याच्या वहिनीच्या पायांना हात लावून नमस्कार करतो आणि तिला मिठी मारतो. याच सीनमुळे मी ही भूमिका नाकारली. ‘हम आपके हैं कौन’मध्ये आमच्या रोमान्सचं कौतुक झाल्यानंतर सलमानने माझ्या पायांना स्पर्श करून मला नमस्कार करणं मला ठीक वाटलं नाही. आणि त्यामुळेच मी ही भूमिका केली नाही.”
या चित्रपटानंतर सलमान खान आणि माधुरीने 2002 साली ‘हम तुम्हारे है‘ या चित्रपटामध्ये काम केले. यामध्ये सलमान आणि माधुरी सोबत अभिनेता शाहरुख खान याने देखिल मुख्य भूमिकेत काम केले होते. त्याशिवाय या तिघांच्या जोडीला देखिल प्रेक्षकांनी पसंती दर्शवली होती.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आजपासून सुरु होणार अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या लग्नाचे प्रीवेडिंग फंक्शन
मोठ्या ब्रेकनंतर आमिर खानची राकुमार संतोषी यांच्या चित्रपटातून दणक्या एंट्री; दिग्दर्शकांनी सांगितले…