बॉलिवूडची ‘बेबो’ करीना कपूर खान आणि अभिनेता सैफ अली खान फेब्रुवारीमध्ये दुसऱ्यांदा पालक बनले. 21 फेब्रुवारी रोजी करीनाने दुसर्या मुलाला जन्म दिला आहे. करीनाला आई बनून एक महिना झाला आहे, परंतु तिचा छोटा मुलगा अद्याप माध्यमांच्या नजरेपासून दूर आहे. तैमूर अली खानच्या धाकटा भावाची झलक पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. पण करीनाने अद्याप तिच्या मुलाचा चेहरा दाखवला नाही किंवा त्याचे नावही सार्वजनिकपणे उघड केले नाही.
अशा परिस्थितीत करीनाच्या मुलाला पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढतच चालली आहे. दरम्यान, अलीकडेच करीनाच्या लहान मुलाचा पहिला फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. असा दावा केला जात आहे की, करीनाचे वडील रणधीर कपूर यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर दोन मुलांचा फोटो शेअर केला आणि तो त्वरित डिलीट देखील केला. हा फोटो सैफीनाच्या लहान मुलाचा होता, असे म्हटले जात आहे.
We have the first photos of Kareena and Saif's new baby boy! pic.twitter.com/CaggBGuflF
— Kareena Kapoor Khan (@KareenaK_FC) April 5, 2021
खरं तर, 5 एप्रिलला करीनाचे वडील रणधीर कपूर यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक कोलाज फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये एका बाजूला तैमूरचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला एक न्यू बॉर्न बेबी होता, ज्याचा चेहरा तैमूरसारखाच दिसत होता. रणधीर यांनी हा फोटो शेअर करताच, युजर्सने त्याचा स्क्रीनशॉट घेतला आणि हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र, त्यानंतर लगेच रणधीर यांनी हा फोटो इंस्टावरून डिलीट केला. पण तोपर्यंत बऱ्याच युजर्सने त्याचा स्क्रीनशॉट घेतला होता. हा फोटो करीना कपूरच्या धाकटा मुलाचा होता, असे म्हटले जात आहे.
करीनाने तिच्या लहान मुलाचा फोटो महिला दिनानिमित्त इंस्टाग्रामवर शेअर केला होता. परंतु त्या फोटोमध्येही तिने बाळाचा चेहरा दाखवला नव्हता. चाहते वाट बघत आहेत की, हा छोटा नवाब तैमुरसारखा माध्यमांच्या नजरेत कधी कैद होईल.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-