Sunday, June 22, 2025
Home बॉलीवूड आनंद गगनात मावेना! ‘गुड बाय’ चित्रपटात बिग बींच्या पत्नीची भूमिका साकारणार ‘ही’ अभिनेत्री

आनंद गगनात मावेना! ‘गुड बाय’ चित्रपटात बिग बींच्या पत्नीची भूमिका साकारणार ‘ही’ अभिनेत्री

बॉलिवूडमधील ‘गुड बाय’ या चित्रपटाची शूटिंग चालू झाली आहे. नुकतेच अभिनेत्री नीना गुप्ता ‘गुड बाय’च्या टीममध्ये सामील झाल्या आहेत. ‘बधाई हो’ आणि ‘शुभमंगल ज्यादा सावधान’ यांसारख्या चित्रपटांमध्ये नीना यांनी कमालीची भूमिका पार पाडली आहे, आणि आता त्या अमिताभ बच्चन आणि ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदाना यांच्यासोबत ‘गुड बाय’ या चित्रपटात काम करणार आहेत.

नीना या चित्रपटात बिग बींच्या बायकोची भूमिका निभावणार आहेत. हे दोघेही पहिल्याच वेळेस एकमेकांसोबत काम करणार आहेत. नीना गुप्ता आणि अमिताभ बच्चन दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल खूप आदर आणि सन्मान आहे. नीना गुप्ता या अमिताभ बच्चन यांच्या खूप मोठ्या फॅन असल्याची गोष्ट त्यांनी त्याच्या तोंडाने सांगितली आहे.

या चित्रपटात काम करण्यासाठी नीना खूपच उत्साहित आहे. याबद्दल त्यांनी सांगितले की,”जेव्हा विकासने मला चित्रपटाची कहाणी सांगितली, तेव्हा मी खूप खुश झाले होते. ही एक कमालीची कहाणी आहे आणि जर चित्रपटाची कहाणी चांगली असेल, तर मी इतर गोष्टींबद्दल विचार करत नाही. यातील सगळ्या भूमिका खूप सुंदर लिहिल्या आहेत आणि मी अमिताभ बच्चनसोबत काम करण्यासाठी खूप उत्साहित आहे. हे माझ्यासाठी एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे आणि मी याबद्दल खूप खुश आहे.”

अमिताभ बच्चन यांनी ‘बधाई हो’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एक नोट लिहिली होती. ज्यामध्ये त्यांनी नीनाच्या कामाचे खूप कौतुक केले होते. नीनाने याच्यापूर्वी एकता कपूरसोबत व्यावसायिकरीत्या ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात काम केले होते आणि आता ‘गुड बाय’ या चित्रपटात दुसऱ्यांदा एकत्र काम करणार आहेत.

‘गुड बाय’ या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘विकास बहल’ यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती बालाजी टेलिफिल्म्स आणि रिलायन्स एंटरटेनमेंट द्वारे केली आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदाना महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पारंपारिक ड्रेसमध्ये ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित दिसतेय एकदम भारी! तब्बल ‘इतक्या’ किमतीत तुम्हीही घेऊ शकता विकत

-अरुणाचल प्रदेशातील आगीत नुकसान झालेल्या लोकांसाठी धावून आले वरुण- नताशा, केली ‘इतक्या’ लाख रुपयांची मदत

-अभिनेत्री बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या तरुणींना राणीचा ‘गुरुमंत्र’, म्हणाली ‘…तर तुम्ही खुशाल या’

हे देखील वाचा