Wednesday, July 15, 2026
Home साऊथ सिनेमा दादासाहेब पुरस्कार प्राप्त दाक्षिणात्य दिग्दर्शक के विश्वनाथ यांचे निधन

दादासाहेब पुरस्कार प्राप्त दाक्षिणात्य दिग्दर्शक के विश्वनाथ यांचे निधन

तेलगू सिनेसृष्टीतील अतिशय दिग्गज आणि प्रतिभावान दिग्दर्शक के विश्वनाथ यांनी २ फेब्रुवारी रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. के विश्वनाथ हे वयानुसार होणाऱ्या काही गंभीर आजारांचा सामना करत होते. त्यांना २०१७ साली भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके या पुरस्कारने देखील गौरवण्यात आले होते. के विश्वनाथ यांना कला तपस्वी या नावाने ओळखले जायचे. त्यांना पाच राष्ट्रीय पुरस्कार, राज्य नंदी पुरस्कार, १० दक्षिण फिल्मफेयर पुरस्कार, १ हिंदी फिल्मफेयर पुरस्कार आदी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.  

के विश्वनाथ यांना त्यांच्या कला क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी आंध्रप्रदेश राज्यातील रघुपति वेंकैया पुरस्कार आणि नागरिक सम्मान पद देखील प्रदान करण्यात आले होते. के विश्वनाथ यांनी ऑडिओग्राफरच्या रूपात त्यांच्या करियरची सुरुवात केली होती. पुढे ६० च्या दशकात त्यांनी प्रदर्शन कला, दृश्य कला आणि सौंदर्यशास्त्रवर आधारित चित्रपटांसोबत विविध प्रकारच्या तब्बल ५३ फिचर चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते.

एक दिग्दर्शक म्हणून के विश्वनाथ यांचा पहिला सिनेमा होता १९६५ साली आलेला अक्किनेनी नागेश्वर अभिनित ‘गोवरम’ होता. त्यांचे शंकरभरणम, स्वाथिनुथ्यम, सागर संगमम आणि स्वयंकृषि आदी अनेक सिनेमे तुफान गाजले. २०१० साली आलेला ‘सुभाप्रदम’ हा त्यांच्या दिग्दर्शित केलेला शेवटचा सिनेमा ठरला. दिग्दर्शनासोबतच त्यांनी ‘कालीसुंदरम रा’, ‘नरसिम्हा नायडू’, ‘टैगोर’ आणि ‘मिस्टर परफेक्ट’ आदी काही चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला. त्यांनी हिंदीत ‘सरगम’, ‘कामचोर’, ‘शुभकामना’, ‘जाग उठा इन्सान’, ‘सूरसंगम’, ‘संजोग’, ‘ईश्वर’, ‘संगीत’, ‘धनवान’ हे चित्रपट दिग्दर्शित केले होते.

के विश्वनाथ यांना त्यांच्या कार्यासाठी आणि कला क्षेत्रातील योगदानासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील ओळख मिळाली. के विश्वनाथ यांच्या चित्रपटांमधून जात, रंग, अपंगत्व, लैंगिक भेदभाव, कुप्रथा, दारू, सामाजिक-आर्थिक अनेक समस्यांवर जागरूकता निर्माण करायचे काम त्यांनी केले. सिनेसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी कायमच त्यांना लोकंच्या मनात स्थान असेल.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
‘हे तर काहीच नाय’ शोमध्ये प्रेक्षकांना रमेश देव यांना अनुभवायची मिळणार शेवटची संधी, निधनापूर्वी लावली होती शोमध्ये हजेरी
चित्रपटांपासून दूर असूनही बक्कळ पैसा कमावते शमिता शेट्टी; पण मिळवू शकली नाही बहीण शिल्पासारखं यश

हे देखील वाचा