Monday, June 23, 2025
Home अन्य ‘उफ्फ!’ नाकातल्या नथीने वाढवले हिना खानचे सौंदर्य, केला थेट चाहत्यांच्या काळजावर वार

‘उफ्फ!’ नाकातल्या नथीने वाढवले हिना खानचे सौंदर्य, केला थेट चाहत्यांच्या काळजावर वार

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम हिना खानला आपण सगळ्यांनी वेगवेगळ्या ड्रेसमध्ये पाहिले आहे. मालिकेमध्ये साधी साडी घालून तिच्या सालसपणाने सगळ्यांच्या मनावर राज्य करणारी तसेच बिग बॉसमध्ये अनेक मॉर्डन आणि बोल्ड ड्रेस घालून प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री हिना खान ही नेहमीच तिच्या वेगवेगळया स्टाईलने सगळ्यांना आकर्षित करत असते. नुकताच तिने पारंपारिक ड्रेसमध्ये एक फोटो काढला आहे. जो सगळीकडे प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. या ड्रेस सोबतच तिने नथ घातली आहे. त्यामुळे ती खूपच सुंदर दिसत आहे.

हिना खानने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिने निळ्या रंगाचा लेहेंगा घातला आहे. टेलिव्हिजनवर नागिन बनून सगळ्यांचे मन जिंकणाऱ्या या अभिनेत्रीचा हा शृंगार पाहून सगळेजण तिच्या प्रेमात पडत आहेत. त्यात तिने नाकात घातलेली नथ तर चाहत्यांच्या काळजावर वार करत आहे. नथीमुळे तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे.

फोटोमध्ये हिनाने केस मोकळे सोडले आहेत आणि हलकेसे कर्ल केले आहे. केसांना केलेल्या गोल्डन ब्राऊन हायलाईटने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. तिने शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी खूप कमेंट केल्या आहे. तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. तिच्या चाहत्यांसोबतच अनेक टीव्ही कलाकारांनी देखील तिच्या या फोटोचे कौतुक केले आहे.

तिचा हा फोटो पाहून अभिनेता अध्ययन सुमनने ‘उफ्फ’ अशी कमेंट केली आहे. सोबतच अदा खान आणि आमना शरीफ यांनी हार्ट आणि फायरची ईमोजी पोस्ट करून कमेंट केली आहे.

हिना खान ही तिच्या स्टाईल आणि फॅशनमुळे सर्वत्र ओळखली जाते. ती कोणताही ड्रेस खूप विश्वासाने घालत असते. त्यामुळे प्रेक्षकही तिला भरभरून प्रतिसाद देत असतात.

हिना केवळ टीव्ही मालिकेतच नाही, तर चित्रपटांमध्येही झळकली आहे. तिने ‘हॅक्ड’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मल्टीकलर स्विमसूटमध्ये बोल्ड अंदाजात दिसली प्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर विंगेट; पाठीवरील टॅटूने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

-‘दोन कोटी रुपये की, ६ मुलींसोबत हॉलिडे?’, प्रियांकाच्या प्रश्नावर कपिलने दिले जबरदस्त प्रत्युत्तर, ऐकून तुम्हीही खदखदून हसाल

-‘बिग बॉस १४’ फेम निक्की तांबोळीच्या बाथरूममधील व्हिडिओने वेधले चाहत्यांचे लक्ष, ग्लॅमरस अंदाजावर चाहते फिदा

हे देखील वाचा