बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत काही दिवसांपूर्वीच पुन्हा एकदा ट्विटरवर परतली आहे. स्पष्टवक्तेपणा, टीका, बेधडक वृत्ती, कोणालाही उद्देशून थेट पोस्ट टाकणे, पंगा घेणे, समाजात वाद घडवणे आदी अनेक कारणांमुळे कंगनाचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले होते. मात्र ते पुन्हा सुरु झाले आहे. एवढे घडूनही पंगा क्वीन काही शांत राहायचे नाव घेत नाही. ती सतत कोणत्या ना कोणत्या कलाकाराला फैलावर घेताना दिसत आहे. तिच्या या परतण्यामुळे कंगणामध्ये पुन्हा बळ आले असल्याचेच चित्र दिसत आहे. कलाकार आणि चित्रपटानंतर कंगनाने तिचा मोर्चा आता सिने माफियांकडे वळवला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा एकदा कंगनाने या माफिया लोकांवर तिच्या मनातील धाडस काढली सोबतच धमकी देखील दिली आहे.

कंगनाने नुकतेच तिच्या इंस्टग्राम अकाऊंटच्या स्टोरीमधून पोस्ट केली आहे. तिने या पोस्टमध्ये थेट माफिया लोकांना धमकी देखील दिली आहे. कंगनाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “ज्यांना माझी काळजी आहे, त्या सर्वांना मला सांगायचे आहे की, काल रात्रीपासून माझ्या घराच्या अवतीभोवती मला कोणत्याही संशयास्पद हालचाली होताना दिसून आल्या नाहीत. कॅमेरा घेऊन किंवा कॅमेऱ्याशिवाय माझा कोणीही पाठलाग देखील केला नाही. बघा जे भुतं लाथांची भाषा समजतात ते फक्त लाथांचीच भाषा समजतात. माझा हा संदेश त्या चंगू मंगू गॅंगसाठी आहे, मुलांनो, तुम्ही कोणत्याही ऐऱ्या गैऱ्याशी वैर घेतलेले नाही. तुम्ही आत्ताच नीट व्हा नाहीतर मी तर घरात घुसून मारेन आणि ज्यांना मी वेडी वाटते त्यांना माहितीच आहे की मी वेडी आहे, पण मी किती वेडी आहे हे तुम्हाला माहित नाही.”
याआधीच्या पोस्टमध्ये कंगनाने म्हटले होते की, तिचा कोणीतरी पाठलाग करत आहे. ती जिथे कठे जाते तिथे तिचा पाठलाग होत आहे. तिने सांगितले की, पापरजी बॉलिवूडमधल्या कलाकारांकडे जातात कारण त्यांना त्याचे पैसे मिळतात. मात्र ती किंवा तिची टीम कोणालाही पैसे देत नाही मग त्यांच्या बातम्या ठेवण्यासाठी कोण त्यांना पैसे पुरवत आहे? तत्पूर्वी कंगनाने रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यावर देखील अनेक गंभीर आरोप करत ते एकाच इमारतीमध्ये वेगवेगळ्या घरात राहत असल्याचे सांगितले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शेखर सुमनने प्रियंका चौधरी अन् एमसी स्टॅनवर केला रॅप, स्पर्धक हसून हसून लाेटपाेट
सुकेशने तुरुंगातून पुन्हा लिहिले पत्र; म्हणाला, ‘मी चाहत खन्नासारखा गोल्ड डिगर …’










