बॉलिवूडमध्ये एक अभिनेत्री आणि चित्रपट निर्माती म्हणून आपली खास ओळख बनवणारी अभिनेत्री पूजा भट्टने 90 च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तिची खूप चांगली फॅन फॉलोविंग होती. एके काळी तिची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते उतावीळ होत असत. अशातच पूजा भट्ट शुक्रवार (24 फेब्रुवारी) रोजी तिचा 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. जाणून घेऊया तिचा जीवन प्रवास

पूजा भट्टचा (pooja bhatt) जन्म 24 फेब्रुवारी 1972 रोजी मुंबई येथे झाला. तिचे वडिलांचे नाव महेश भट्ट आहे, तर आईचे नाव किरण भट्ट हे आहे. तिने 1989 मध्ये आलेल्या ‘डॅडी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन तिचे वडील महेश भट्ट यांनी केले होते. त्यावेळी ती केवळ 16 वर्षाची होती. त्यावेळी तिचा अभिनय सगळ्यांना खूप आवडला होता. त्यानंतर तिने ‘सडक’ या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात संजय दत्त मुख्य भूमिकेत होता. त्यावेळी वयाच्या 18 व्या वर्षी तिने संजय दत्त सोबत किसींग सीन दिला होता. पूजा जेव्हा 18 वर्षाची होती तेव्हा तिला दारू पिण्याची सवय लागली होती. तिला दारूची सवय लागली होती. याचा परिणाम तिच्या कामावर होत होता. त्यानंतर तिने 2016 मध्ये तिने दारू सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिने दारूच्या बाटलीला देखील हात लावला नाही.
पूजा भट्ट एके काळी वादात फसली होती. त्यामुळे तिला ‘कॉट्रोवर्सी क्वीन’ म्हटले तरी वावगे ठरणार नाही. तिचे वडील महेश भट्ट यांना किस करताना फोटोशूट असो किंवा तिचा घटस्फोट असो ती अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. तिने तिचे आयुष्यात तिच्या मर्जीनुसार जगले आहे. परंतु एके काळी एका अभिनेत्रीसोबत झालेल्या वादामुळे ती चर्चेत आली होती.

या वादाचे कारण इतर काही नसून एकमेकींच्या पुढे जाणे हेच होते. पूजा भट्टने करिश्मा कपूरचे आई वडील म्हणजे रणधीर आणि बबिता यांना अपमानकारक शब्द वापरले होते. त्यावेळी करिश्माने पूजाला चांगलेच सुनावले होते. करिश्मा भट्टने एका मुलाखतीत सांगितले होते की, “तू सांग माझी काय चूक आहे, पूजा भट्ट. तिने माझ्या आई वडिलांचा अपमान केला आणि मी तिला उत्तर दिले कारण तिला माझ्या आई वडिलांना बोलण्याचा काहीही अधिकार नाही.”
आता त्या दोघींमध्ये खूप चांगले नाते आहे. १९९० मध्ये पूजा भट्टने स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की, “की ९० च्या दशकात खूप एकटी होते. माझ्या सोबतच्या अभिनेत्रींनी अनेक चित्रपटात काम केले. परंतु मी मात्र केवळ २३ चित्रपट केले.” या कारणाने देखील ती चर्चेत आली होती.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीने सोशल मीडियाला अचानक ठोकला रामराम, पोस्ट शेअर करत दिली माहिती
अत्यंत वादग्रस्त : ‘स्वरा भास्कर जर हजारो पुरुषांसोबत रात्र घालवणार…’, अयोद्धेतील महंताच्या विधानाने खळबळ