Friday, March 29, 2024

दारूचे व्यसन सोडण्यावर पूजा भट्टने केली मोकळपणाने चर्चा; म्हणाली, ‘हे कोणासोबतही होऊ शकते’

बॉलिवूडमधील अनेक कलाकार व्यसनाला बळी पडले आहेत. अनेकजण अजूनही यामध्येच अडकलेले आहेत, तर अनेकांनी यातून आपली सुटका केली आहे. यातीलच एक अभिनेत्री म्हणजे पूजा भट्ट होय. पूजाने पुन्हा एकदा दारूचे व्यसन सोडण्यावर मोकळेपणाने चर्चा केली आहे.

तिने म्हटले आहे की, महिलांनी याबाबत जास्त मोकळेपणाने बोलले पाहिजे. तिने तो काळ आठवला आहे, जेव्हा तिने दारू सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी तिने हे कोणापासूनही लपवले नव्हते. तिने सन १९८९मध्ये प्रदर्शित झालेल्या आपल्या ‘डॅडी’ चित्रपटाचाही उल्लेख केला आहे. या चित्रपटातही अल्कोहॉलिझमचा मुद्दा मांडला आहे. (Actress Pooja Bhatt Speaks On Dealing With Alcoholism)

दारू सोडण्यावर केली मोकळेपणाने चर्चा
‘डॅडी’ चित्रपटात दाखवले आहे की, एक मुलगी आपल्या वडिलांना दारूच्या व्यसनापासून वाचवते. अनुपम खेर यांनी या चित्रपटात पूजा भट्टच्या वडिलांची भूमिका साकारली आहे, जे दारूमध्ये डुंबलेले असतात. चित्रपटाचे दिग्दर्शन पूजा भट्टचे वडील महेश भट्ट यांनी केले होते. फिल्मफेअरशी बोलताना पूजाने म्हटले की, “आम्ही बऱ्याच गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, ४ वर्षांपूर्वी जेव्हा मी दारू सोडण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा मी याबाबत मोकळेपणाने चर्चा केली होती. मी ‘डॅडी’ सारख्या चित्रपटापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. ही कहाणी एका मुलीची होती, जी आपल्या वडिलांचे दारूचे व्यसन सोडवते. मी स्वत: या समस्येतून जात होते.”

लोकांच्या प्रतिसादाने झाले होते खुश
पूजा सांगते की, “मी लोकांना भेटले आणि त्यांना सांगितले की, हे कोणासोबतही होऊ शकते. महिलांनी विशेषत: याबाबत आणखी मोकळेपणाने व्यक्त झाले पाहिजे. मला अनोळखी व्यक्तींकडून जो प्रतिसाद मिळाला, त्याने मी खूप खुश होते.” तिने पुढे सांगितले की, “माझे आणि माझ्या वडिलांची कारकीर्द एवढी चालली, त्यामागील कारण होते की, या कहाण्या त्यांच्या हृदयातून येत होत्या.”

पूजा भट्टचे चित्रपट
पूजा भट्टने आतापर्यंत ‘सडक’, ‘दिल है के मानता नहीं’, ‘चाहत’, ‘जिस्म २’, ‘बॉर्डर’, ‘जुनून’, ‘डॅडी’, ‘तमन्ना’, ‘अंगरक्षक’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

हे देखील वाचा