Friday, March 27, 2026
Home बॉलीवूड ‘ए ताई, दोन जीन्स घालून गरम होत नाही का?’ नेटकऱ्यांनी उडवली वरुण धवनच्या भाचीची टिंगल

‘ए ताई, दोन जीन्स घालून गरम होत नाही का?’ नेटकऱ्यांनी उडवली वरुण धवनच्या भाचीची टिंगल

बॉलिवूड सुपरस्टार वरुण धवनची भाची अंजिनी धवन सोशल मीडियावर धमाल करताना दिसत आहे. वरुणच्या लग्नापासून अंजिनी बरीच लाईमलाईटमध्ये आली, तेव्हापासून तिच्या सोशल मीडिया पोस्ट्स खूप चर्चेत आहेत. त्यानंतर तिचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. परंतु आता ती तिच्या निराळ्या फॅशन सेन्समुळे ट्रोल झालेली पाहायला मिळाली.

अलीकडेच तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यामधील तिचे स्टाईल स्टेटमेंट नेटकऱ्यांना काही समजले नाही आणि त्यामुळे फोटोवर बऱ्याच कमेंट्स येत आहेत.

अंजिनीने तिच्या इंस्टाग्रामवर फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. यात तिने डबल जीन्स परिधान केलेली दिसत आहे. तिच्या या फोटोवर युजर्सने वेगवेगळ्या कंमेट्स करायला सुरुवात केली आहे. यावर अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जियाने फायर इमोजी पोस्ट केले आहे. त्याच वेळी एका युजरने लिहिले, “जीन्स वर जीन्स.” दुसर्‍याने लिहिले आहे, “ताई उन्हाळ्यात दोन जीन्स घालून गरम नाही होत का.”

अंजिनी धवन अद्याप कोणत्याही शोमध्ये किंवा चित्रपटात दिसली नाही. पण सोशल मीडियावर ती बऱ्यापैकी लोकप्रिय आहे. तिच्या इंस्टाग्रामवर तिचे अनेक फोटोशूट्स आपल्याला पाहायला मिळतील. बॉडी लँग्वेज आणि आत्मविश्वासामुळे ती एखाद्या प्रोफेशनल मॉडेलपेक्षा कमी दिसत नाही. ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते, असे अनेक अंदाज तिच्याबद्दल बांधले जात आहेत. मात्र, धवन कुटुंबाकडून आतापर्यंत अशी कोणतीही बाब समोर आली नाही. अंजिनीचे वडील सिद्धार्थ वरुण धवनचे चुलतभाऊ आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनेता संजय कपूरच्या पोरीनं ‘या’ बाबतीत सोनम अन् जान्हवीलाही टाकलंय मागं, लवकरच करणार बॉलिवूड पदार्पण

-‘खूप छान दिसते!’ ‘बिग बॉस’ फेम शहनाज गिल बनली ‘सरदारनी’, पाहा तिचा भन्नाट लूक

-व्हिडिओ: दिया मिर्झाने केला सावत्र मुलीचा वाढदिवस साजरा, वैभव रेखीच्या एक्स वाईफनेही लावली हजेरी

हे देखील वाचा