बॉलिवूड ‘धाकड गर्ल’ कंगना रणौत नेहमीच आपल्या रोखठोक वक्तव्यामुळे चर्चेचा विषय ठरत असते. यामुळे कधी तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. अशातच आता ती, भगवान कृष्ण आणि माता यशोदा यांच्यावर ट्रोल होत असलेल्या सद्गुरू जग्गी वासुदेवच्या बाजूने उभी राहिली आहे. यामुळे ती चांगलीच ट्रोल होत आहे. परंतु असे असले तरीही सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांवर कंगना चांगलीच कडाडली आहे.
कंगना म्हणाली की, हिंदू हजारो वर्षांपासून गुलाम का आहेत? हे समजून घेणे कठीण नाही. कंगनाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
https://twitter.com/KanganaTeam/status/1380330132083245060
कंगनाने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “हिंदू संस्कृती, योग आणि राष्ट्रवादाचा प्रचार करतात, असा दावा करून वामपंथी लोक सद्गुरुजींना त्रास देतात आणि दक्षिणपंथी लोक निंदा करताना म्हणतात की, सद्गुरुजी हे स्वतंत्र विचारांचे उदारमतवादी आहेत, आणि हिंदू देवता आणि धर्मग्रंथांचा सन्मान करीत नाहीत.”
https://twitter.com/KanganaTeam/status/1380331515444400137
कंगनाने ट्विटमध्ये पुढे लिहिले आहे की, ‘हजारो वर्षांपासून हिंदूं गुलाम का आहेत? हे समजून घेणे कठीण नाही. कोणतीही रणनीती नाही, योजना नाही, सुसंगतता नाही. मूर्ख लोकांनो, कावेरी वाचविण्यात, ग्रामीण मुलांना शिकवण्यासाठी किंवा मंदिरे वाचविण्यात तुम्ही त्यांचे समर्थन करू शकता का? जर नाही, तर गप्प बसा.”
काय होता सद्गुरूंचा कृष्ण- यशोदा वाद?
मागील काही दिवसांमध्ये सद्गुरू यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्येे सद्गुरू यशोदाला कृष्णाची लव्हर सांगत होते. यानंतर सोशल मीडिया युजर्सनी लव्हरचा अर्थ प्रेमिका असा घेतला आणि सद्गुरूंना ट्रोल केले. तरीही हा वाढता वाद पाहून ईशा फाऊंडेशनकडून यावर स्पष्टीकरणही देण्यात आले होते.
कंगनाचा ‘थलायवी’ हा चित्रपट येत्या २३ एप्रिल, २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-खरंच! राहुल वैद्य आणि दिशा परमारने केले गुपचुप लग्न? फोटो पाहून चाहते करतायत अभिनंदन










