Sunday, June 22, 2025
Home बॉलीवूड आजही गोविंदा त्याने ‘या’ सुपरहिट सिनेमासाठी दिलेल्या नकाराला पस्तावत असेल, जाणून घ्या तो सिनेमा

आजही गोविंदा त्याने ‘या’ सुपरहिट सिनेमासाठी दिलेल्या नकाराला पस्तावत असेल, जाणून घ्या तो सिनेमा

हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात सुंदर किंबहुना सोनेरी काळ म्हणून ९० चे दशक ओळखले जाते. या दशकाने हिंदी सिनेसृष्टीला अनेक सुपरस्टार तर दिले, सोबतच अनेक हिट सिनेमे देखील दिले. ९० चे दशक म्हटल्यावर त्या दशकातील सर्वात मोठ्या सुपरस्टारबद्दल न बोलणे होणारच नाही. याच दशकातील सर्वात मोठा स्टार होता गोविंदा. गोविंदाने त्याच्या चित्रपटांनी, कॉमेडीने, ऍक्शनने प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणावर मनोरंजन केले. त्याने एकापाठोपाठ सरस आणि हिट सिनेमे दिले. मात्र आज आम्ही तुम्हाला गोविंदाने नाकारलेल्या आणि सलमान खानने होकार दिलेल्या एका सिनेमाबद्दल सांगणार आहोत.

Photo Courtesy ScreenGrabYouTube
Colors TV

गोविंदा आणि डेव्हिड धवन ही ९० च्या काळातील यशस्वी जोडी होती. या जोडीचा सिनेमा म्हटले तर तो गाजणारच हे जणू सर्वश्रुत होते. त्याकाळात गोविंदा आणि डेव्हिड यांनी कुली नं 1, हिरो नं 1, आदी सिनेमे केले होते, सर्वच ब्लॉकबस्टर. अशातच डेव्हिड धवन यांनी गोविंदाला समोर ठेऊन बीबी नं 1 ची स्क्रिप्ट लिहिली. डेव्हिड यांनी सिनेमा गोविंदाला ऐकवला तो देखील तयार झाला, सर्व नीट सुरु असताना अचानक त्याने त्याला सुश्मितासोबत काम करायचे नसल्याचे सांगितले. यामुळे आता सर्वच अडले. गोविंदा सिनेमासाठी तयार होता, मात्र सुश्मितासोबत काम करण्यास तो नकार देत होता. पुढे त्याने सिनेमाला नकार दिला.

गोविंदाने नकार दिल्यानंतर डेव्हिड धवन हा सिनेमा घेऊन सलमान खानकडे गेले त्याने सिनेमा करण्याची तयारी दाखवली आणि सिनेमा झाला. सिनेमा प्रदर्शित झाला आणि तुफान गाजला देखील. आजही हा सिनेमा जेव्हा जेव्हा टीव्हीवर लागतो तेव्हा तो पहिला जातो. एवढी या सिनेमाची क्रेझ आहे. सलमानच्या करियरमधला एक मोठा हिट सिनेमा म्हणून याकडे पाहिले जाते. आज हा सिनेमा एका मोठ्या ओटीटी माध्यमावर देखील असून तुम्ही तो कधीही पाहू शकता.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जान्हवी विमानतळावर ‘बाॅयफ्रेंड’साेबत झाली स्पाॅट, पॅपराझींची नजर पडताच लाजली अभिनेत्री

कुटुंबाने का केले नाहीत तारक मेहता यांचे अंत्यसंस्कार? घ्या कारण जाणून…

हे देखील वाचा