‘अली बाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा शिजान खान त्याची सहकलाकार असणाऱ्या तुनिशा शर्मा आत्महत्या केसमध्ये मागील दीड महिन्यापासून तुरुंगात होता. त्याच्या सुटकेसाठी मोठे प्रयत्न केले जात होते, मात्र त्याच्या कुटुंबाला यात यश मिळत नव्हते. आता अखेर शिजान खान तुरुंगातून बाहेर आला आहे. शिजान खानची बहीण असलेल्या अभिनेत्री शफक नाजने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून होळीच्या निमित्ताने एक फोटो शेअर केला आहे. हा त्यांचा फॅमिली फोटो आहे.
View this post on Instagram
शफक नाजने शेअर केलेल्या फोटोमध्ये शिजान खान त्याच्या बहिणींसोबत, आईसोबत आणि पपीसोबत पोज देताना दिसत आहे. या फोटोमध्ये त्याने ब्लू शर्ट आणि ब्लॅक पँट घातली असून, संपूर्ण कुटुंब हसून पोज देताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना शफकने कॅप्शनमध्ये लिहिले, “ज्या लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला त्या लोकांना धन्यवाद.”
तत्पूर्वी टीव्ही अभिनेत्री असलेल्या तुनिशा शर्माने २४ डिसेंबर २०२२ रोजी अलीबाबा मालिकेच्या सेटवर फाशी घेत आत्महत्या केली होती. शिजान खानवर तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचा आरोप करण्यात आला होता. शिजानला त्याच दिवशी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर ५ मार्च २०२३ रोजी त्याला कोर्टाने १ लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन दिला आहे. अलीबाबा या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा शिजान खान आणि मरियम ही भूमिका साकारणारी तुनिशा शर्मा हे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र तिच्या आत्महत्येपूर्वी १५ दिवस आधी त्यांचे ब्रेकअप झाले होते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
Womens Day Special: आधुनिक विचाराच्या क्षेत्रात राहूनही ‘या’ अभिनेत्री ठरल्या घरगुती हिंसाचाराच्या बळी
हाेळीच्या रंगात रंगली श्वेता शिंदे