बॉलिवूडची किंबहुना संपूर्ण मनोरंजनविश्वातील ड्रामा क्वीन म्हणून अभिनेत्री राखी सावंत ओळखली जाते. ती नेहमीच छोटी गोष्टी देखील मीडियासमोर खूप मोठी करून सांगण्यात पटाईत आहे. मागील अनेक दिवसांपासून ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तुफान चर्चेत आली आहे. तिचे आदिल खानचे लग्न एक महिना देखील नीट टिकले नसावे तोपर्यंत त्यांच्यात खटके उडाले आणि राखीने त्याच्या विरोधात पोलीस तक्रार देखील केली. नुकताच तिने तिचा ‘झूठा’ हा म्युझिक अल्बम देखील प्रदर्शित केला. हे गाणे तिच्या खऱ्या आयुष्याशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. यात एक फॅन तिला कार देतो, नंतर लग्न करून धोका देतो. या गाण्याच्या लॉन्चिंग वेळी तिला खूप रडू आले. याचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
या कार्यक्रमात ती मीडियासोबत बोलताना म्हणाली, “लोकं म्हणतात राखी सावंतला कोण धोका देणार? तिच्यासोबत कोण वाईट करणार? का मी माणूस नाही का? मी स्त्री नाही का? माझ्यात हृदय नाही का? मी संसाराची स्वप्न नाही पाहू शकत ना?” असे म्हणत ती जोरात ओरडली आणि खाली बसत जोरजोरात रडायला लागली. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओवर नेटकाऱ्यानी भरपूर कमेंट्स देखील केल्या आहेत. अनेकांनी राखी नाटक करत असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी तिला सांत्वना दिली आहे.
राखी सावंतने या गाण्याचे पोस्टर तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “एक गोष्टी जी तुम्ही कधीही लपवू शकत नाही ती म्हणजे तुम्हाला मानसिक रूपात आलेले अपंगत्व. ” म्युझिक व्हिडिओमध्ये दाखवले गेले आहे की, काही आठवड्यांमध्येच राखीचे आयुष्य कसे बदलून जाते. या गाण्याची सुरुवात होण्याआधी राखी बाथटबमधे स्वतःला बुडवताना दिसते. पुढे दिसते की, एका फॅन तिला स्टुडिओमध्ये पहिले आणि तिला एक कार गिफ्ट केली. दोघांनी एका कार्यक्रमात निकाह केला. या पूर्ण गाण्यामध्ये तो फॅन त्याला पकडले जात तोपर्यंत त्याचा धोका लपवताना देखील दाखवला आहे. यात तिचा आईचा मृत्यू देखील दाखवला आहे. ती घरी येते तेव्हा तिचा नवरा दुसऱ्या स्त्रीसोबत असतो. तो राखील मरतो, आणि शेवटी राखी त्याला जेलमध्ये टाकते.
View this post on Instagram
या गाण्यात ते सर्व सीन आहेत जे जे राखीच्या आयुष्यात मागे घडले. या गाण्याला अल्तमश फरीदीने गायले असून, संगीत आसिफ फरीदीने दिले आहे तर शबाब अली लिहिले आहे. या गाण्याचे दिग्दर्शन मुदस्सर खान ने केले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“मला सिगारेट ओढणाऱ्या मुली आवडतात …”, सीमा पाहवा यांचं माेठं वक्तव्य, एकदा वाचाच
मधुचंद्रानंतर पारंपरिक पद्धतीने लग्न करणार स्वरा, हळदीच्या रंगात रंगली अभिनेत्री