टीव्ही रियॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी’चा सीझन १३ लवकरच सुरू होणार आहे. सध्या या शोमध्ये कोण कोण स्पर्धक असणार आहे याबाबत मीडियामध्ये विविध बातम्या येत आहेत. मागील अनेक सीझनपासून हा शो बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) होस्ट करत आहे. मागील अनेक सीझन पासून रोहित या शोचे सूत्रसंचालन करत आहे. तो या शोचे सूत्रसंचालन का करतो याबद्दल एकदा त्याला टीव्हीची हॉट अभिनेत्री रुबीना दिलायकने प्रश्न विचारला होता. यावर त्याने उत्तरही दिले आहे.
अभिनेत्री प्रथम पहिल्यांदा रोहित शेट्टीला म्हणाली, की “आज मला तुम्हाला प्रश्न विचारण्याची संधी मिळाली आहे आणि मी ही संधी मी जाऊन देणार नाही. तुम्ही उत्तर द्या आणि तुम्हाला कोणताही प्रश्न चुकीचा वाटला, तर इथेच मला ओरडा.” यावर रोहित हसला. (why rohit shetty host khatron ke khiladi every year)

मग रुबीनाने प्रथम रोहितला प्रश्न विचारला, “सर, या शोमध्ये असे काय आहे की, तुम्ही दरवर्षी हा शो का होस्ट करता?” यावर रोहित म्हणतो की, “मला या शोचा जॉनर आवडतो. मी हेच करतो. बाकीच्या जॉनरमध्ये मला इतकी आवड नाही. इतरांनाही हा शो खूप आवडतो, त्यामुळे मी त्याकडे आकर्षित झालो आहे.”
त्यानंतर रुबिना विचारते की, “शोच्या सेटवर कोणत्या दोन गोष्टी नेहमी एकत्र ठेवाव्यात?” याला प्रत्युत्तर देताना रोहित म्हणतो, “फियर फंदा आणि इतर कोणत्याही खेळाडूला चुकूनही दुखापत होऊ नये याची काळजी.” तसेच पुढील उत्तरात तो सांगतो की, घराबाहेर असल्यावर तो भारतीय जेवण मिस करतो. त्याचबरोबर ‘खतरों के खिलाडी’ शोची टीम कुटुंबासारखी मानतो.
रुबिनानेही रोहितच्या भीतीबद्दल विचारले. या प्रश्नाच्या उत्तरात रोहित म्हणाला की, “कुटुंबाला कोणताही त्रास होऊ नये, हे माझे सर्वात मोठे भय आहे. रुबिनाच्या पुढील प्रश्नावर, रोहितने खतरों के खिलाडीचे आवडते ठिकाण केपटाऊन सांगितले. त्याचवेळी रुबिनाने शेवटचा प्रश्न ‘खतरों के खिलाडी’मधील रोहितचा आतापर्यंतचा आवडता स्पर्धक विचारला. प्रत्युत्तरात रोहितने रुबीनाचे नाव घेतले.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘झूठा’ गाण्याच्या प्रदर्शनावेळी जोरजोरात रडली राखी सावंत म्हणाली, ‘मी संसाराची स्वप्न नाही पाहू शकत का?’
जय हो..! कोट्यवधी भारतीयांना गुडन्यूज, आरआरआर चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला मिळाला मानाचा ऑस्कर पुरस्कार