मनोरंजनविश्वात असे अनेक कलाकार आपल्याला पाहायला मिळतील. ज्यांचे शिक्षण काहीतरी वेगळेच आहे, मात्र ते आवड आणि पॅशन म्हणून मनोरंजनविश्वात काम करतात. कोणी इंजिनियर आहे, कोणी शेफ आहे, कोणी टीचर आहे तर कोणी डॉक्टर आहे. मात्र त्यांनी आपल्या छंदासाठी आणि आपल्या इच्छेसाठी शिक्षणाच्या दृष्टीने करियर न निवडता मनाचा ऐकला आणि अभिनयात आले. मराठी मनोरंजनविश्वात देखील असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी शिक्षण एका विशिष्ट क्षेत्रात घेतले आणि करियर किंवा काम वेगळ्याच क्षेत्रात करत आहे.
असेच एक कलाकार म्हणजे अभिनेते अमोल कोल्हे. ‘छत्रपती शिवाजी’ आणि ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकांमधून त्यांनी मोठ्या प्रमाणवर लोकप्रियता मिळवली. तसे पहिले तर अमोल कोल्हे हे आज जरी मनोरंजनविश्वात काम करत असले तरी ते शिक्षणाने डॉक्टर आहे. हो अमोल कोल्हे यांनी एमबीबीएस केले असून ते एक डॉक्टर आहे. मात्र त्यांनी प्रॅक्टिस कधीच केली नाही. त्यांनी अभिनयातच करियर केले. मात्र आता तुम्ही म्हणाला अचानक अमोल कोल्हे यांच्या एमबीबीएसचा विषय निघण्यासारखे झाले काय? अहो हा विषय आम्ही नाही तर त्यांनीच काढला आहे.
View this post on Instagram
झाले असे की अमोल कोल्हे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याच व्हिडिओ वरून त्यांच्या एमबीबीएसचा विषय सुरु झाला. मध्यंतरी अमोल कोल्हे यांच्या मानेला दुखापत झाली होती. याबद्दल त्यांनी स्वतः माहिती दिली होती. आता त्यांनी पुन्हा एकदा त्यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, या व्हिडिओमध्ये ते त्यांचा एमआरआय रिपोर्ट बघताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, “दुखावलेली मान सांभाळत स्वतःचे एमआरआय (MRI) रिपोर्टस् पाहून एमबीबीएसमध्ये शिकलेलं काही आठवतंय का? याची खात्री करुन पाहिली. शेवटचा पर्याय आहे रेडिॲालॅाजिस्टने दिलेला रिपोर्ट वाचणे. (मान(ो)या ना मान(ो)”.
अमोल कोल्हे यांच्या या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणावर नेटकऱ्यांच्या आणि कलाकारांच्या कमेंट्स येत असून, अनेकांनी त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला तर काहींनी ‘मग आठवले का?’ असे मजेशीर पद्धतीने देखील विचारले आहे. यातच संगीतकार आणि गायक असलेल्या सलील कुलकर्णी यांनी केलेली कमेंट चांगलेच लक्ष वेधून घेत आहे. त्यांनी लिहिले, “माझं पण अगदी असंच होतं. मधूनच थोडं थोडं आठवतं”. सध्या हा व्हिडिओ खूपच व्हायरल झाला आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
…आणि शशी कपूर यांनी पूनम ढिल्लोच्या खाडकन वाजवली कानाखाली, उपस्थित लोकं फक्त पाहतच राहिले
कॉमेडियनच नाही, तर डान्सर म्हणूनही कमवलंय बरंच नाव, जावेद जाफरींबद्दल खास गोष्टी एकाच क्लिकवर