Friday, October 9, 2026
Home › अन्य › आर्चीने ‘मखना’ गाण्यावर केला बेधडक डान्स; तिचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही लागाल नाचू

आर्चीने ‘मखना’ गाण्यावर केला बेधडक डान्स; तिचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही लागाल नाचू

आपल्या अभिनयाने सर्वांना अक्षरशः वेड लावणारी मराठी चित्रपट सृष्टीतील खूप कमी वेळात प्रसिद्धीचे शिखर गाठणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. रिंकूला तिच्या रिंकू या नावापेक्षा आर्ची या नावाने सर्वत्र ओळखतात. कारण तिच्या सैराट या चित्रपटाने तिला एवढी ओळख निर्माण करून दिली. तिला सर्वत्र चित्रपटातील नावानेच ओळखतात.

रिंकू सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिचे फॅन फॉलोविंग देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे.त्यामुळे तीचा कोणत्याही व्हिडिओ किंवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. असाच एक व्हिडिओ रिंकूने पोस्ट केला आहे,जो वेगाने होताना दिसत आहे.

रिंकूने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. तुम्ही पाहू शकता की, रिंकू डान्स करताना दिसत आहे. मखना या गाण्यावर तीने अगदी बिनधास्त डान्स केला आहे.

तीने पिंक कलरचा शर्ट परिधान केला आहे. या व्हिडिओ तिने कॅप्शन दिले आहे की, “तुम्ही जिथे कुठे असाल तिथला प्रत्येक क्षण एन्जॉय करा.” रिंकूचा व्हिडिओ खूपच वेगाने सर्वत्र व्हायरल होत आहे. आणि तिचे चाहते तिच्या या व्हिडिओला पसंती दर्शवत आहेत.

मराठी चित्रपट सृष्टीतील एवढ्यात कमी वयात आणि एवढ्या कमी कालावधीत स्वतःचं नाव कमावणारी रिंकू ही कदाचित पहिलीच अभिनेत्री असावी. तिच्या एका चित्रपटाने तिला केवळ महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात एक वेगळी ओळख करून दिली.

रिंकूच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने वयाच्या पंधराव्या वर्षी २०१६ मध्ये चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला. तिने सैराट या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शंभर कोटी पेक्षाही जास्त बिजनेस केला होता. तसेच या चित्रपटाचा हिंदीमध्ये धडक नावाचा रिमेक देखील झाला आहे. त्यानंतर तिने कागर आणि मेकअप या चित्रपटात काम केले आहे.

हे देखील वाचा