Friday, March 13, 2026
Home मराठी सई ताम्हणकरच्या या खास अदा करतायत सर्वांनाच घायाळ

सई ताम्हणकरच्या या खास अदा करतायत सर्वांनाच घायाळ

मराठी चित्रपटसृष्टीतील सगळ्यात बिनधास्त अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. ती नेहमीच तिच्या स्टाईलने आणि एका अनोख्या अंदाजाने सगळ्यांमध्ये चर्चेत असते. अत्यंत साध्या भोळ्या भूमिका पासून ते अत्यंत बोल्ड आणि डॅशिंग भूमिकेतपर्य‌त तिने पात्र निभावली आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनावर तिचा एक वेगळाच ठसा उमटला आहे. सई ताम्हणकर ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती नेहमीच‌ तीचे व्हिडिओ आणि फोटोज इंस्टाग्रामवर शेअर करून तिच्या चाहत्यांना तिच्याबद्दल माहिती देत असते. असाच एक तीचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

सई ताम्हणकरने हा फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट केला आहे. या फोटोमध्ये सईने लाल कलरचा लेहेंगा आणि जांभळ्या रंगाचा ब्लाउज घातला आहे. तसेच लाल रंगाची ओढणी देखील घेतली आहे. फोटोमध्ये सईने गळ्यात हिऱ्यांचा हार घातला आहे. तसेच संपूर्ण केस मागे बांधले आहे. सई या फोटोमध्ये खूपच बोल्ड दिसत आहे.कपाळावर लावलेल्या त्या छोट्याशा टिकलीने तिच्या सौंदर्यात अजून आणखीच भर पडली आहे.

तिच्या या फोटोला‌ तिच्या चाहत्यांच्या तसेच अनेक कलाकारांच्या देखील प्रतिक्रिया येत आहेत. आणि सगळेजण तिच्या सौंदर्याचे कौतुक करताना दिसत आहे. सईने या ड्रेसमध्ये तीन वेगवेगळ्या पोजमधले फोटो शेअर केले आहे हे फोटो बघून तिच्या प्रेमात पडेल.

सई ताम्हणकरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘सनई चौघडे’ या चित्रपटांमधून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. सोबत टेलिव्हिजनवर देखील काम केले आहे। तिने ‘या गोजिरवाण्या घरात’, ‘अग्निपरीक्षा’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. नंतर तिने मराठी चित्रपटसृष्टीत खूप वेगाने भरारी घेतली.तिने ‘दुनियादारी’, ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’, ‘वजनदार’, ‘क्लासमेट’ यांसारखे सुपरहिट चित्रपट केले आहेत. सोबत तिने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये हे तिचे कमालीचे नाव कमावले आहे तिने हिंदीमध्ये हंटर या चित्रपटात काम केले आहे.

हे देखील वाचा