Saturday, May 23, 2026
Home अन्य मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा डान्स व्हिडिओ आला वादाच्या भोवऱ्यात; वकील आर. कृष्णराजवर होतेय जोरदार टीका

मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा डान्स व्हिडिओ आला वादाच्या भोवऱ्यात; वकील आर. कृष्णराजवर होतेय जोरदार टीका

नुकताच केरळमधील थ्रिसूर मेडिकल कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांचा डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण या व्हिडिओबद्दल सोशल मीडियावर एक नवीन वाद सुरू झाला आहे.

दोन आठवड्यांपूर्वी, थ्रिसूर मेडिकल कॉलेजच्या नवीन आणि जानकी या विद्यार्थ्यांनी, त्यांचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. नेटकऱ्यांना हा व्हिडिओ इतका आवडला की, तो अल्पावधीतच जोरदार व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये केलेल्या या दोघांच्याही डान्सची खूप प्रशंसा केली गेली. परंतु अलीकडेच हायकोर्टाचे वकील आर. कृष्णराज यांनी या व्हिडिओवर अशी प्रतिक्रिया दिली होती, ज्यामुळे हा व्हिडिओ आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

 

वास्तविक, आर कृष्णराज यांनी त्यांच्या सोशल मीडियावर या व्हिडिओबद्दल एक पोस्ट केली आणि लिहिले की, “थ्रिसूर मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी जानकी आणि नवीन यांचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. ते खूप चुकीचे आहे. ते दोघेही वेगवेगळ्या धर्मांचे आहेत. तर जानकीच्या पालकांनी या बाबतीत सावधगिरी बाळगली पाहिजे.” यासह, निमिशा म्हणजेच फातिमा, जिने हिंदू धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारला तिचा संदर्भ देत ते म्हणाले की, “त्या प्रकरणाचा विचार करता, मुलीबाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आपण सर्वांनी जानकीचे वडील ओमकार आणि त्यांच्या पत्नीसाठी प्रार्थना केली पाहिजे.”

आर. कृष्णराज यांच्या या भाष्यानंतर, जणू सोशल मीडियावर कमेंट्सचा पूर आला आहे. प्रत्येकजण त्यांच्या वक्तव्यावर टीका करू लागला आणि त्यांच्याविरूद्ध #danceisnotjihad आणि #resisthate चे हॅश टॅग ट्रेंड होऊ लागले आहेत. बर्‍याच युजर्सने “जर हेतू द्वेष करण्याचा असेल, तर तुमचा निषेध करावा लागेल” हा नारा देखील दिला आहे. त्याचबरोबर लोकही विद्यार्थ्यांना पूर्ण पाठिंबा देत आहेत. त्यांच्या समर्थनार्थ अनेक विद्यार्थी डान्स व्हिडिओही बनवत आहेत.

दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणावर जानकी म्हणाली की, “आम्ही हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी शूट केला होता. कारण आम्हा दोघांनाही हे गाणं खूप आवडलं. यासाठी आम्ही दोन तास सरावही केला आणि व्हिडिओ कॉलेजच्या गच्चीवर शूट केला. वैद्यकीय महाविद्यालयाच्या संपूर्ण कर्मचार्‍यांना व्हिडिओबद्दल माहित होते. कोणालाही काही अडचण नव्हती.

हे देखील वाचा