Tuesday, January 14, 2025
Home बॉलीवूड शाहरुख खानच्या लेटेस्ट लूकवर दीपिका झाली फिदा, कमेंट करत म्हणाली…

शाहरुख खानच्या लेटेस्ट लूकवर दीपिका झाली फिदा, कमेंट करत म्हणाली…

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांची जोडी बॉलिवूड इंडस्ट्रीतील टॉप ऑन-स्क्रीन जोडप्यांपैकी एक आहे. जेव्हा जेव्हा हे स्टार्स पडद्यावर एकत्र येतात तेव्हा धमाका करतात. अशात नुकतेच ‘पठाण‘ या चित्रपटातून दोघेही लोकांची मने जिंकताना दिसले. त्याचवेळी काल रात्री म्हणजेच शुक्रवारी (दि. 31 मार्च)ला नीता मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटरचे उद्घाटनात स्टार्सने चार चांद लावले. या सोहळ्यात मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज सहभागी झाले हाेते, ज्यामध्ये शाहरुख खानचाही समावेश होता.

शाहरुख खान (shah rukh khan) आणि दीपिका पदुकोण (deepika padukone ) यांच्या जोडीने ‘पठाण’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’ आणि ‘ओम शांती ओम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये धमाकेदार अभिनय केला आहे. दरम्यान, शालिनने शाहरुखचा लेटेस्ट फाेटाे पाेस्ट केला, ज्यावर प्रतिकिया देताना दीपिका स्वतःला रोखू शकली नाही. शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये बॉलिवूडचा बादशाह काळ्या पोशाखात खूपच देखना दिसत होता.

शालीनाने शाहरुखचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये ‘डेड’ लिहिले आणि लव्ह आय इमोजी बनवली. दुसरीकडे, अभिनेत्याचा स्मार्टनेस पाहून दीपिका पदुकोणने शालिनाच्या कमेंटला जोडून लिहिले, ‘मी टू.’ दीपिकाची ही प्रतिक्रिया चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे. यासोबतच चाहते शाहरुखच्या फोटोवर हार्ट टाकून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shaleena Nathani (@shaleenanathani)

दीपिका पदुकाेणच्या वर्क फ्रंटविषयी बाेलायचे झाले, तर ती अलीकडेच सिद्धार्थ आनंदच्या ‘पठाण’मध्ये दिसली होती, ज्यात शाहरुख खान आणि जॉन अब्राहम देखील होते. येत्या काही दिवसांत ही अभिनेत्री ऋतिक रोशनसोबत ‘फायटर’मध्येही दिसणार आहे. याव्यितिरिक्त दीपिकाकडे ‘प्रोजेक्ट के’ आणि ‘द इंटर्न’ सारखे चित्रपटही आहेत. शाहरुख खानबद्दल बोलायचे झाले, तर तो नयनतारासोबत एटलीच्या ‘जवान’मध्ये दिसणार आहे. यासोबतच तो तापसी पन्नूसोबत ‘डंकी’ चित्रपटातही दिसणार आहे.(deepika padukone love bollywood actor shah rukh khan look at nmacc event the reaction of the actress is in headlines )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा :
‘इथे हे सर्वांसोबतच होते’ गरम मसाला फेम अभिनेत्रीने दिला प्रियांकाच्या ‘त्या’ विधानाला पाठिंबा

‘सर्जा’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, चित्रपटात झळकणार ‘हे’ नामवंत चेहरे

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा