७०च्या दशकातील अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी त्यांच्या अभिनयाने सगळ्यांच्या मनावर राज्य केले आहे. त्यांचे नाव आणि काम आजही सगळ्यांच्या ओठात आहे. यामधील एक दिग्गज अभिनेत्री म्हणजे तनुजा. त्यांनी त्यांच्या आयुष्यात एका पेक्षा एक चित्रपट केले आहेत. त्यांनी त्यांच्या अभिनयाने आणि वेगळ्या अंदाजाने सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. तनुजा या अभिनेत्री काजोलची आई आहेत. तसेच तनुजा यांची आई देखील अभिनेत्री होती. तनुजा या बॉलिवूड मधील एक खूप जास्त नखरे करणाऱ्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात असे. पण एकदा त्यांना सेटवर चांगलीच कानफाटात बसली होती. त्यानंतर त्यांचे सगळे नखरे उतरले आणि नंतर त्यांनी त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित केले. त्यांच्या आयुष्यातील एक किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
काजोल आज यशस्वी अभिनेत्री आहे, ती फक्त तिची आई तनुजा. तनुजा या त्यांच्या आईकडून अभिनय शिकल्या होत्या. तसेच त्यांची बहीण देखील अभिनेत्री होती. थोडक्यात काय तर हा अभिनयाचा वारसा त्यांना त्यांच्या परिवाराला कडूनच मिळाला होता. तनुजा यांनी त्यांच्या करीअरची सुरुवात ‘हमारी बेटी’ या चित्रपटातून केली होती.
1960 मध्ये तनुजाला त्यांची आई शोभना यांनी ‘छबीली’ या चित्रपटातून लॉन्च केले होते. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तनुजा खूप नखरे करत होत्या. त्यामुळे संपूर्ण टीम वैतागली होती. त्या नेहमीच सेटवर मज्या मस्ती करायच्या. त्यांचे हे वागणे या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना अजिबात आवडत नसायचे.
या चित्रपटात एक सीन होता जेव्हा तनुजा यांना रडायचे होते, पण त्या सारख्या हसत होत्या आणि तो सिन नीट करत नव्हत्या. असं एक दोन वेळा नाहीतर सारखं सारखं झालं. त्यामुळे दिग्दर्शकाला खूपच राग आला. एवढंच नाही तर त्या म्हणाल्या की, आज माझा रडायचा मूड नाहीये. त्यावेळी मात्र दिग्दर्शकांना खूपच राग आला आणि त्यांनी तिच्या कानाखाली मारली. यांनतर सगळे एकदम शांत झाले. यानंतर राज कपूर हळूच तिथून निघून गेले. त्यानंतर तनुजा यांनी खूपच संताप व्यक्त केला आणि त्यांची तक्रार करण्यासाठी त्या त्यांच्या आईकडे गेल्या.
तनुजा यांना वाटले की, आता त्यांची आई दिग्दर्शक केदार शर्मा यांना खूप ओरडेल. पण अस काहीच झालं नाही. उलट त्यांच्या आईने त्यांच्या अजुन एक कानाखाली दिली. त्यामुळे त्यांचा आणखीनच संताप झाला. त्यावेळी त्यांची आई केदार शर्मा यांच्याकडे गेल्या आणी म्हणाल्या “आता ती सीनसाठी तयार आहे. खूप रडत आहे, तुम्ही शूटिंग चालू करा.”










