गायक अदनान सामी सतत त्याच्या गाण्यांमुळे आणि सोशल मीडिया पोस्टमुळे गाजत असतो. मात्र आता तो एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. अदनानचा लहान भाऊ असणाऱ्या जुनैद सामीने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. सोबतच अदनानवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
अदनान सामीबद्दल जुनैद सामीने एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. एका माहितीनुसार पोस्टमध्ये जुनैद सामीने लिहिले आहे की, “इमरान खान होण्याची वेळ आता आली आहे. मी माझा भाऊ असणाऱ्या अदनान सामीबद्दल अनेक सत्य उघड करायला जात आहे. देवाशिवाय मला कोणाचीच भीती नाही. मी हे सर्व करू इच्छित नाही, मात्र आता मला असे करावेच लागेल. कारण आता सत्य बाहेर येणे खूपच आवश्यक आहे. मी अदनानला आव्हान देतो की त्याने मी सांगतो त्यातील एक गोष्टी देखील चुकीची असल्याचे सांगावे.
View this post on Instagram
जुनैदने त्याच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले, “१५ ऑगस्ट १९६९ रोजी अदनानचा जन्म रावळपिंडी येथील एका हॉस्पिटलमध्ये झाला. त्यानंतर १९७३ साली माझा जन्म देखील त्याच हॉस्पिटलमध्ये झाला. हे खोटे आहे की, त्याचा जन्म लंडनमध्ये झाला. तो इंग्लंडमध्ये ओ-लेव्हल्समध्ये नापास झाला आणि नंतर लाहोरमधून त्याने पदवी मिळवली. त्यानंतर त्याने अबू धाबी येथून खाजगीरित्या ओ-लेव्हल्स पूर्ण केले.”
जुनैदने त्याच्या पोस्टमध्ये दावा करत लिहिले की, “अदनान सामीने त्याच्या दुसऱ्या पत्नीचा पॉर्न व्हिडिओ बनवला आणि तो जगासमोर दाखवण्यासाठी कोर्टात दिला. मी असे तर माझ्या गर्लफ्रेंडसोबत देखील करू शकत नाही. त्याने २००७ – २००८ साली त्याची पत्नी असलेल्या सबासोबत एक आपत्तीजनक व्हिडिओ बनवला होता. पतिपत्नींमध्ये खूप काही होते, ते फक्त आपल्यातच ठेवावे. अदनान सांगितले की, हा व्हिडिओ त्याने नाही तर सबाच्या बॉयफ्रेंडने बनवा आहे, आणि तो व्हिडिओ कोर्टात देखील दिला आहे, जेणेकरून संपूर्ण भारत तो पाहिल. मात्र हे सर्व खोटे होते. हा व्हिडिओ कोर्टात पाहून सबा बेशुद्ध झाली होती.”
या पोस्टमध्ये जुनैद सामीने अदनानच्या भारतीय नागरिकत्वावर देखील भाष्य केले. त्याला भारतात चांगले पैसे मिळतात म्हणूनच त्याने येथले नागरिकत्व घेतले. यासोबतच जुनैदने अदनानवर अनेक गंभीर आरोप केले, मात्र नंतर ही पोस्ट डिलीट केली. यावर अजून अदनान कडून कोणतेच व्यक्तव आलेले नाही.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
HAPPY BIRTHDAY : जेव्हा चुलत बहिनीने जितेंद्र यांच्यावर लावला होता लैंगिक शोषणाचा आरोप, ऐकून सगळ्यांनाच बसला होता आश्चर्याचा झटका
Jackie Chan Birthday: जॅकी चॅनचे बॉलिवूडशी खास नाते, ‘या’ चित्रपटांमध्ये भारतीय कलाकारांसोबत केले आहे काम