Tuesday, April 7, 2026
Home मराठी ‘बिनधास्त’ अभिनेत्री सई ताम्हणकरच्या ग्लॅमरस अदांची चाहत्यांना भुरळ; फाटाेंवर लाईक्सचा पाऊस

‘बिनधास्त’ अभिनेत्री सई ताम्हणकरच्या ग्लॅमरस अदांची चाहत्यांना भुरळ; फाटाेंवर लाईक्सचा पाऊस

मराठी सिनेसृष्टीतील टाॅप अभिनेत्रींपैकी एक सई ताम्हणकर आहे. सईने तिच्या अभिनयाच्या बळावर स्वत:ला सिध्द केले. सईने केवळ मराठीत नाही, तर हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप साेडली. सई तिच्या कामासाेबतच तिच्या फॅशन स्टाईलसाठी देखील ओळखली जाते. साेशल मीडियावर नियमित सक्रिय राहून सईला तिचे विविध फाेटाे आणि व्हिडिओ शेअर करायला आवडते. अशातच सईने तिच्या अधिकृत इंस्टग्राम अकाउंटवर तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे, जे साेशल मीडियावर येताच तुफान व्हायरल हाेत आहे, ज्यावर चाहते भिन्नभिन्न कमेंट करून अभिनेत्रीवर काैतुकाचा वर्षाव करत आहेत.

सई ताम्हकर (sai tamhankar) नेहमीच स्वतःवर विविध लूक ट्राय करत असते. ती तिचा प्रत्येक लूक अतिशय चांगल्या पद्धतीने कॅरी करत सर्वांनाच आश्चर्यचकित करते. आता पुन्हा एकदा सई तिच्या अश्याच दमदार लूकमुळे चर्चेत आली आहे. सईने रंगीबेरंगी साडी नेसली असून केसांमध्ये गजरा माळला आहे, जाे तिच्या साैंदर्यात चार चांद लावत आहेत. सईने हा फोटो शेअर करत म्हटलं की, “सालस”

सईच्या फाेटाेंवर चाहत्यांनी केला काैतुकाचा वर्षाव
सईला साडीमध्ये पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. एका चाहत्याने अभिनेत्रीच्या फाेटाेवर कमेंट करत म्हणटले की, सई खूप छान’, तर अजून एका चाहत्याने, ‘तू साडीमध्ये अगदी सुंदर दिसते’ असे म्हणत तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. अशात एका चाहत्याने अभिनेत्रीच्या फाेटाेवर कमेंट करत म्हटले की, ‘सालसा म्हणजे काय?’

हे देखील वाचा