आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा या ना त्या कारणामुळे सतत चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिने बॉलिवूडमधील राजकारणाबद्दल व्यक्तव्य केले, ज्यामुळे ती कमालीची गाजत आहे. यासोबतच तिच्या आगामी ‘सिटाडेल’ या सिरीजच्या प्रमोशनमुळे देखील ती सतत लाइमलाईट्मधे येत आहे. सध्या प्रियांका तिचा नवरा निक आणि मुलगी मालतीसोबत भारतात आहे. याच दरम्यान ती एनएमएसीससी इवेंटमध्ये देखील सहभागी झाली होती. मात्र यातच आता पाकिस्तानी अभिनेत्याने प्रियांकाला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले आहे.
With due respect, @priyankachopra . Sharmeen Obaid Chinoy is a Pakistani first just to brush up your knowledge. Much like the way you flaunt your Indian nationality whenever you get the opportunity before claiming to be a South Asian.???????? pic.twitter.com/B7wy8gD8QB
— Adnan Siddiqui (@adnanactor) April 14, 2023
प्रियांकाने पाकिस्तानी दिग्दर्शक शरमीन ओबैद चिनॉयला कलर्सची पहिली वुमन झाल्याबद्दल आणि स्टार वॉर्स सिनेमाला दिग्दर्शित करणारी पहिली महिला झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. अशा शुभेच्छा देताना तिने दिग्दर्शकाला ‘साउथ एशियन’ म्हटले. प्रियांकाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीमध्ये लिहिले, “कलर्सची पहिली पर्सन आणि स्टार्स वॉर्स सिनेमाला दिग्दर्शित करणारी पहिली महिला…आणि ती साऊथ एशियन आहे.!!! शरमीन ओबैद चिनॉय काय ऐतिहासिक क्षण आहे. माझ्या मित्रा मी तुझ्यासोबत आहे.”
यावरच पाकिस्तानी अभिनेता असलेल्या अदनान सिद्धीकीने शरमीन ओबैद चिनॉयला साऊथ एशियन म्हटल्यामुळे तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले आहे. ‘मॉम’ सिनेमातून पदार्पण करणाऱ्या अदनान यांनी ट्विटरवर लिहिले, “विथ ड्यू रिस्पेक्ट प्रियांका चोप्रा, तुझ्या ज्ञानात थोडी भर घालत सांगू इच्छितो, शरमीन ओबैद चिनॉय पाकिस्तानी आहे. ठीक त्या प्रकारे जेव्हा तुला साऊथ एशियन होण्याआधी इंडियन असल्याचे सांगते.” सध्या ही पोस्ट कमालीची व्हायरल होत आहे.
दरम्यान प्रियांका तिची आगामी ‘सिटाडेल’ प्रमोट करत आहे. ही सिरीज एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. शिवाय ती ‘जी ले जरा’ सिनेमात देखील झळकणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-